लिंगायत समाजाला ओबीसीच्या प्रमाणपत्रासाठी शिफारस करू - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

सोलापूर - वीरशैव लिंगायत समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसी समितीकडे शिफारस करू. तसेच मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाबाबत पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

सोलापूर - वीरशैव लिंगायत समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसी समितीकडे शिफारस करू. तसेच मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाबाबत पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

श्रीवीरतपस्वी मंदिरात श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या श्री संकल्पसिद्धी कार्यमहोत्सवांतर्गत वीरशैव लिंगायत संमेलनाचे उद्‌घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामी, श्री श्री श्री उज्जयनी जगद्‌गुरू, श्री श्री श्री श्रीशैल जगद्‌गुरू, श्री श्री श्री काशी जगद्‌गुरू उपस्थित होते.

हिंदू लिंगायत असा उल्लेख होत असल्यामुळे वीरशैव लिंगायत समाजाला ओबीसी समाजाचे प्रमाणपत्र मिळत नाही, असा उल्लेख पालकमंत्री देशमुख यांनी आपल्या मनोगतात केला. त्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, ""लिंगायत समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी ओबीसी समितीकडे शिफारस करण्यात येईल. तसेच मंगळवेढ्यातील प्रस्तावित महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाबाबत येत्या पंधरा दिवसांत निर्णय घेऊन भव्य स्मारक उभारण्यात येईल.''
पंकजा मुंडे यांचेही भाषण झाले.

कार्यमहोत्सवातील कार्यक्रम
- जगदगुरू पंडिताराध्य भगवत्‌पाद यांच्या मूर्तीचे लोकार्पण
- शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना
- संकल्पसिद्धी विशेषांकाचे प्रकाशन
- सामुदायिक विवाह सोहळा

Web Title: lingayat society OBC certificate recommended chief minister