मोहोळ विधानसभा मतदार संघातील मतदारांची यादी प्रसिध्द

List of voters from Mohol Vidhan Sabha constituency
List of voters from Mohol Vidhan Sabha constituency

मोहोळ : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ विधानसभा मतदार संघातील तीन लाख मतदारांची अंतिम यादी गुरूवार (ता. 31) प्रसिद्ध केल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना निवडणुक नायब तहसीलदार चंद्रशेखर लिंबारे म्हणाले, 'मोहोळ विधानसभा मतदार संघात एकुण 144 गावे आहेत. त्यात मोहोळ तालुक्यातील 102, पंढरपूर तालुक्यातील 25 व उत्तर सोलापुर तालुक्यातील 17 गावांचा समावेश आहे. मोहोळ विधानसभा मतदार संघात एकुण 329 मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रावर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.'

एकुण 2 लाख 98 हजार 693 मतदारापैकी 1 लाख 58 हजार 970 पुरूष तर 1 लाख 39 हजार 720 महिला मतदार आहेत. यादी प्रसिद्ध होताच किरकोळ चुका, प्रिंट काढणे यासह अन्य कामासाठी मतदार संघातील तलाठी, मंडलाधिकारी, निबंधक, कार्यालयातील कर्मचारी, नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची निवडणुक शाखेत गर्दी दिसून आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com