ऐका...मुक्‍यांच्या व्यथा ! ; प्राणीमित्रांचे आवाहन

PHOTO-2020-04-06-14-18-30.jpg
PHOTO-2020-04-06-14-18-30.jpg


सांगली ः सध्याच्या लॉकडाऊनमध्ये माणसांचे हाल होत असताना मुक्‍या प्राण्यांची व्यथा कोण ऐकणार? पण येथील प्राणीमित्रांनी एकत्र येते गेले दहा दिवस रोज सुमारे दोन अडीचशे कुत्री-मांजरे, भटक्‍या गायी,म्हैशी,घोडे,गाढवांना खाद्य पुरवले जात आहे. चारा, भात, दुध, अंडी, चिकन असे ज्याच्या त्याच्या गरजेचे खाद्य पुरवण्यासाठी ही मंडळी राबत आहेत. 

लॉकडाऊन सुरु होताच सर्वात आधी हाल मुक्‍या प्राण्यांचे सुरु झाले. अन्न-पाण्याविना त्यांची उपासमार सुरू झाली. विशेषतः फिरत्या गाड्यांवर पोसलेली कुत्री मांजरे हवालदील झाली. त्यांची ही व्यथा प्राणीमित्रांनी ऐकली. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील भटक्‍या प्राण्यांसाठी त्यांनी पदरमोड करून खाद्याची व्यवस्था केली आहे. प्रभागनिहाय त्यांची भटकंती सुरु असते. आत्तापर्यंत सुमारे दोन हजार अशा मोकाट प्राण्यांची त्यांनी प्रेमाने घास भरवला आहे. पुढेही ही व्यवस्था अविरतपणे सुरू राहणार आहे. 

प्राणीमित्र अजित काशीद यांच्यासह त्यांची टीम सध्या या कामगिरीसाठी सरसावली आहे. पालिकेचे श्‍वान कमिटीचे सदस्यही यात पुढे आहेत. सारे सदस्य मिळून रोज एका परिसरातील किमान 150 ते 200 कुत्री व मांजरे यांना अन्न देतात. भटक्‍या कुत्री आता शांत झाली आहेत. प्रारंभी ती आक्रमक झाली होती.

स्वच्छता निरीक्षक प्राणिल माने, मुकादम अप्पा शिकलगार, सुनील हवालदार, प्राणीमित्र मुस्तफा मुजावर, ऍनिमल सहाराच्या पुष्पा काशीद, राहुल पाटील, श्‍वान कमिटीचे विशाल कुदळे, गौतम जयकर, राहुल सनदे, स्वप्नील वाडकर, धम्मरत्न सासणे, हर्षद खताल, रवी जाधव, रणधीर कांबळे, किशोर दबडे यांचा या मोहिमेत सहभाग आहे. आयुक्त नितीन कापडणीस, डॉ. सुनील आंबोळे, रवींद्र ताटे यांचे त्यांना सहकार्य आहे. 



"" नागरिकांनाही आपआपल्या परिसरातील भटक्‍या जनावरांची अन्न व पाण्याची व्यवस्था करावी. सध्याच्या बिकट काळात माणूस म्हणून आपले अस्तित्व जपणे गरजेचे आहे. मुक्‍या प्राण्याप्रती संवेदनशीलता दाखवून आपण समाजापुढे योग्य तो संदेश दिला पाहिजे. भारतीय संस्कृती प्राणीमात्राचा विचार करणारी आहे. आपण हा संदेश जगाला देऊया. '' 

अजित काशीद, 
अध्यक्ष, ऍनिमल सहारा 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com