सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झाडांची बेकायदा विक्री

बाबासाहेब शिंदे 
शनिवार, 23 जून 2018

लातूर रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची सरकारी झाडे बेकायदेशीर तोडुन विक्री केल्याप्रकरणी संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर व चोरीचे लाकुड घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा, बार्शी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा आप्पासाहेब पवार यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. 

पांगरी(सोलापूर)- लातूर रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची सरकारी झाडे बेकायदेशीर तोडुन विक्री केल्याप्रकरणी संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर व चोरीचे लाकुड घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा, बार्शी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा आप्पासाहेब पवार यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. 

त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग बार्शी यांच्या हद्दीतील बार्शी-लातूर राज्य रस्त्यालगत ढेंबरेवाडी ते पांगरी दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेली जवळपास चार ते पाच सरकारी मोठी झाडे त्या भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संगनमताने झाडे तोडून येडशी (ता.जि.उस्मानाबाद) येथील व्यापाऱयांस चोरुन विकून टाकलेली आहेत. 

तसेच, सदर तोडण्यात आलेली रस्त्याच्या कडेची सरकारी झाडे तोडण्यासाठी तहसीलदार अथवा वनविभागाची कुठलीही परवानगी नसताना परस्पर झाडे तोडून शासनाचे आर्थिक नुकसान केलेले आहे. तरी संबंधितांची चौकशी करून संबंधित दोषींची तसेच चोरीचे लाकूड घेणाऱ्या व्यापाऱ्यांची चौकशी करून त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे असेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: lllegal sale of trees of Public Works Department