सहकारी साखर कारखान्यांवर कर्जाचा डोंगर 

तात्या लांडगे
बुधवार, 20 जून 2018

सोलापूर : साखर उद्योग भरभराटीला येत असतानाच कारखान्यांसमोर थकबाकीचे आव्हान आहे. उत्पादनखर्च व साखर दराच्या तुलनेत या वर्षी कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील नोंदणीकृत 202 सहकारी साखर कारखान्यांपैकी मागील वर्षी गाळप घेतलेल्या 101 कारखान्यांकडे तब्बल 14 हजार 859 कोटींची थकबाकी आहे. 

राज्यात या वर्षी उत्पादित झालेल्या 160 लाख मेट्रिक टन साखरेपैकी सुमारे 99 मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. उत्पादनाचा अंदाज असतानाही सरकारने निर्यात अथवा बफर स्टॉकच्या निर्णयाला विलंब केला. सध्या बहुतांश साखर कारखान्यांनी साखर विक्री न केल्याने राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही "एफआरपी'ही मिळालेली नाही. यंदा सुमारे 10 लाख हेक्‍टर उसाचे क्षेत्र आहे. पुढील गाळप हंगामातही मोठ्या प्रमाणावर साखेरचे उत्पादन होणार आहे. मात्र, साखर विकायची कुठे आणि शेतकऱ्यांचे पैसे कसे द्यायचे, असा प्रश्‍न कारखान्यांसमोर राहणार आहे. 

शासकीय कर्जाचे होणार पुनर्गठन 
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडील शासकीय कर्जाचे पुनर्गठन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राकडे पाठविणार असल्याचे साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी सरकारने राज्यातील बंद पडलेले (आजारी) सहकारी साखर कारखाने सुरू करण्याकरिता डिसेंबर 2016 मध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्‍त केली. परंतु, सद्यःस्थिती पाहता ती समितीच आजारी पडल्याची चर्चा आहे. 

नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने - 202 
गाळप घेतलेले कारखाने - 101 
थकबाकीदार कारखाने - 101 
कर्जाची थकबाकी - 14,859 कोटी 
शासनाची थकबाकी - 1,765 कोटी 
बॅंकांच्या कर्जाची थकबाकी - 13,094 कोटी  

Web Title: loan on sugar factories