प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे तीनतेरा

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील नंदूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दुरुस्ती अभावी बंद असल्याने या योजनेचे तीनतेरा वाजले असून कोट्यवधी रूपयाचा निधी आजपर्यंत वाया गेल्याने या योजनेची मालमत्ता बेवारस असून येथील जलशुध्दीकरण केंद्र म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा असे आहे. तर भोसे पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे जनतेचे पाण्यासाठीचे भोग मात्र संपेना.     

नंदूर व इतर दहा गावांसाठी असणारी ही योजना गेले अडीच वर्ष बंद असल्याने नदीत पाणीसाठा असुन देखील केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अकरा गावाला पिण्यासाठी पाणी मिळू शकत नाही. युती शासनाच्या काळात 1996 साली नंदूर सह मरवडे, डोणज, तळसंगी, भालेवाडी ,बालाजी नगर, कागष्ट, येड्राव, कात्राळ, डिक्सळ या अकरा गावांचा कायमचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठीच्या या योजनेवर शासनाचे अंदाजे नऊ ते दहा कोटी रुपये खर्ची केले.

अजूनही चार ते पाच गावात अनेक कामे अपुर्ण आहेत. 2015 साली  तालूक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर पाँईट म्हणून उपयोग होत होता. सध्या या ठिकाणी एकही कर्मचारी, सुरक्षा रक्षक नसल्याने कोट्यावधी रूपयाची मालमत्ता बेवारस स्थितीत आहे. यातील काही साहित्य चोरीस गेले आहे. नदीपात्रातील जॅकवेल व अन्य साहित्य वापरामुळे खराब झाले. वीजेचा ट्रान्फार्मर देखील नाही त्यामुळे या योजनेतील वीजेची थकबाकी वाढली. या योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राची अवस्था उकीरड्यासारखी झाली. योजना बंद असल्याने अकरा गावातील लोकांची पाण्यासाठी 'पाणी उशाला -कोरड घशाला अशी स्थिती झाली  शासनाने 7 मे 2016 ला परिपत्रक काढून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडेच राहणार असल्याचे सुचवन्यात आले होते त्यानंतर देखील ही योजना अजुन पूर्ववत सुरु झाली नाही.

त्यामुळे नंदुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाना मुख्यमंत्री पेयजल योजनेचा आधार मिळणार असल्याने त्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडेच राहणार असल्याचे या शासन निर्णयात म्हटले आहे 11 गावांची योजना नियोजनाअभावी बंद पडली आहे, ही योजना ज्या गावांना आहे त्या गावांना इतर दूसरी कोणती योजनाही राबविता येत नसल्याने या योजनेखाली असलेली गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहेत, मात्र ही योजना चालविनारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग झोपेचे सोंग घेऊन शांत असल्याने ही योजना असून अडचण नसून खोळंबा झाली आहे.

सध्या जरी या योजनेला देखभाल दुरुस्ती आणि काही ठिकाण पाईप गळती रोखणे मोटरी बदललने या कामाला त्वरित निधी दिला तरी देखील  किमान दीड महीना तरी पाणी मिळायला लागेल तो पर्यन्त उन्हाळा संपत आलेला असेल  एखादी योजना पूर्ण करण्यासाठी किती काळ जनतेने वाट पहावी याचे सीमोल्लंघन झाले आहे
पुढील महिन्यात पाणी टचाई जांणवणार आहे.

ही योजना सुरू करून पाणीपुरवठा करून द्यावा.अद्यापही हस्थांतरीत न केल्यामुळे दुसरी योजना राबविता येत नाही.त्यामुळे ही योजना असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. शासनाने तातडीने मार्ग काढावा, असे सरपंच गुरूय्या स्वामी यांनी सांगितले. 

फटेवाडी व तळसंगीच्या टाकीचे काम अर्धवट असून  मनुष्यबळच्या अभावी योजनेच्या मालमत्तेकडे लक्ष देता येत नाही.दुरूस्तीसाठी निधीची मागणी केली आहे.सध्या पाणी मिळावे यासाठी मागणीही नाही, असे उपअभियंता यु.बी.माशाळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com