विवाह झाले रद्द ;  दुसरा मुहूर्त शोधण्याची लागली घाई का ते वाचा..... 

मंगळवार, 30 जून 2020

रविवारी पूर्णत: लॉकडऊन ; विवाह समारंभात अडचणी   

बेळगाव : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून येत्या 5 जुलैपासून प्रत्येक रविवारी पूर्ण दिवस लॉकडऊन असणार आहे. यामुळे रविवारी ज्यांच्या घरात विवाह समारंभ आहेत, त्यांची तारांबळ उडणार आहे. यामुळे त्यांना पुन्हा वेगळा मुहूर्त शोधावा लागणार आहे. 

कोरोनामुळे लॉकडऊन असल्याने मार्च व मे महिन्यामध्ये विवाह झालेच नाहीत. मे महिन्यात राज्यात लॉकडऊनमध्ये शिथिलता दिल्याने अनेकांनी आपले विवाह समारंभ करुन घेतले, मात्र, अजूनही काही जणांचे विवाह आहेत, त्यांनी जुलै महिन्यात विवाहची तारीख निश्‍चित केली आहे. जुलै महिन्यात 5 व 12 रोजी रविवार असल्याने काही विवाहांचे आयोजन केले आहेत. मात्र, रविवारी लॉकडऊन असल्याने त्यांना त्याचा फटका बसला आहे. काही जणांना रविवारी लॉकडऊनची माहिती समजताच त्यांना कार्यालयात असलेले विवाह समारंभ रद्द करून पुढील तारखेचे आयोजन केले आहे, तर अनेकांनी सोहळे रद्द केलेले नाहीत. 

हेही वाचा- मिरज पंढरपूर दिंडी मार्गावर शुकशुकाट...वारकऱ्यांच्या सेवेक-यांंमध्ये अस्वस्थता -

रविवारी पूर्णत: लॉकडऊन असल्याने पूर्ण व्यवहार 100 टक्के बंद असणार आहेत. तसेच बाहेर फिरणाऱ्यांवरही निर्बॅंध असणार आहेत. लॉकडऊन असल्याने प्रशासनाकडूनही परवानगी मिळणार नसल्याने लग्न सोहळे पुढे ढकलल्याशिवाय पर्याय नाही. राज्यात 4 मे पासून लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सुरुवातीला फक्त रविवारी पुर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. दोन ते तीन आठवडे याची अंमलबजावणी करण्यात आली. पुन्हा आठवड्यातील सात दिवस लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली. चार दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा दर रविवारी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. तर रात्री 8 ते सकाळी 5 पर्यंत बंद असणार आहे. 

हेही वाचा- खरसुंडी परिसरात विहिरीतील मोटारी चोरीचे प्रमाण वाढले...पोलिस तपास अद्याप सुरूच -

येत्या रविवारी मंगल कार्यालयात लग्नासाठी बुकींग केले होते. मात्र, रविवारी पूर्णत: लॉकडऊन असल्याने बुकींग रद्द करून पुढची तारीख घेतली आहे. लग्न रद्द झाल्याने मंगल कार्यालयाला आर्थिक फटका बसला आहे. 
शंकर मुरकुटे, व्यवस्थापक, नेताजी मंगल कार्यालय येळ्ळूर