esakal | लाखोंच्या "डिपी' वर झळकतोय हा लोगो..

बोलून बातमी शोधा

logo on dp.jpg

सांगली-जगभर धुमाकूळ घातलेल्या "कोरोना' विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सोशल मिडियावर सध्या मोठ्या प्रमाणात जागृती सुरू आहे. अनेकांनी "व्हॉटस्‌ ऍप' वरील स्वत:चा आणि ग्रुपचा "डिपी' बदलला आहे. "मीच माझा रक्षक' असा लोगो हजारो-लाखोंच्या "डिपी' वर झळकत आहे. "माझे आरोग्य..माझी जबाबदारी' तसेच "करोना हरेल देश जिंकेल' असा संदेश या "डिपी' वरून दिला जात आहे

लाखोंच्या "डिपी' वर झळकतोय हा लोगो..
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली-जगभर धुमाकूळ घातलेल्या "कोरोना' विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सोशल मिडियावर सध्या मोठ्या प्रमाणात जागृती सुरू आहे. अनेकांनी "व्हॉटस्‌ ऍप' वरील स्वत:चा आणि ग्रुपचा "डिपी' बदलला आहे. "मीच माझा रक्षक' असा लोगो हजारो-लाखोंच्या "डिपी' वर झळकत आहे. "माझे आरोग्य..माझी जबाबदारी' तसेच "करोना हरेल देश जिंकेल' असा संदेश या "डिपी' वरून दिला जात आहे

 
"कोरोना' वरून सोशल मिडियावर गेले काही दिवस टिंगल टवाळीला ऊत आला होता. त्याच काळात जागरूक "नेटकरी' कोरोना बाबत सावधगिरीचा संदेशही देत होते. कोरोना मुळे देशभर लागू केलेला जनता कर्फ्यू असेल किंवा सध्या सुरू असलेली संचारबंदी असेल त्यावरून अनेकांना कल्पनाशक्तीला आणि विनोदबुद्धीला चालना मिळाली. त्यातून निर्माण झालेले विनोद एकमेकाला "फॉरवर्ड' केले जात असताना "कोरोना' चोर पावलाने नव्हेतर थेट जवळ पोहोचल्यामुळे सावधगिरी बाळगली जात आहे. आता सावधगिरीच्या "पोस्ट' सर्वाधिक फॉरवर्ड होताना दिसत आहेत. 


व्हॉटस्‌ ऍप आणि फेसबुकवरून गेले काही दिवस फेकन्यूज आणि अफवा पसरवल्या जात होत्या. काही ठिकाणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक "व्हॉटस्‌ ग्रुप' च्या ग्रुपवर अफवांना प्रतिबंध केला जात आहे. "ऐकेल त्याचा फायदा आणि न ऐकणाऱ्याला कायदा' अशा शीर्षकाखाली संबंधित विनोदवीरांना आणि अफवा पिकवणाऱ्यांना बडगा दाखवला गेला आहे. याच संदेशाच्या खाली "कर्फ्यूमुळे सर्व बंद असले तरी आमचे काम जोरात सुरू आहे' असे नमुद करून महाराष्ट्र पोलिस जागरूक असल्याची जाणीव करून दिली आहे. 


"कोरोना' हा स्वाभिमानी विषाणू असून तोपर्यंत तुम्ही त्याला आणायला जात नाही तोपर्यंत तो तुमच्या घरी येणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वाभिमानी राहून घरीच रहा..त्याला आणायला बाहेर पडू नका अशा आशयाच्या पोस्टमधून गांभीर्य दाखवून दिले जात आहे. त्याचबरोबर कोरोनाची अ, ब, क आणि ड साखळी कशी जोडली जाते हे देखील एका पोस्टमधून दाखवून देत स्वत:लाच 144 लागू करून स्वत:सह कुटुंबाचा बचाव करा असे आवाहन केले जात आहे. सर्वात जास्त कोरोना पसरलेल्या चीन देशाने त्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे घरातून बाहेर न पडता तुम्ही देखील नियंत्रण मिळवा असा सल्लाही दिला जातोय. 


"कोरोना' मुळे संचारबंदी सुरू असून सोशल मिडियावर अफवा पसरवणाऱ्यांना व्हॉटस्‌ ऍप आणि फेसबुकवर जागरूक मंडळी अटकाव करत आहेत. त्याचबरोबर विनाकारण घराबाहेर पडल्यास पोलिसांची लाठी पार्श्‍वभागावर कशी पडते याचे व्हिडीओ टाकून समज दिली जात आहे.