लोकमंगलच्या ठेवीदारांना व्याजासहित पैसे परत करू - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

सोलापूर - सेबीने दिलेल्या आदेशानुसार लोकमंगलने घेतलेल्या ठेवी ठेवीदारांना व्याजासहित परत करणार असल्याची माहिती सहकारमंत्री व लोकमंगल ऍग्रोचे तत्कालीन संचालक सुभाष देशमुख यांनी आज दिली. सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर सहकारमंत्री देशमुख यांनी ही माहिती दिली.

राज्यातील बहुतांश साखर कारखाने अशाच पद्धतीने ठेवी गोळा करतात. त्याच पद्धतीने लोकमंगल ऍग्रोनेही ठेवी गोळा केल्या आहेत; परंतु सेबीने प्रचलित कायद्यानुसार दिलेल्या आदेशान्वये ठेवीदारांच्या ठेवी सव्याज परत केल्या जातील. सेबीने सांगितल्याप्रमाणे लोकमंगल ऍग्रो पूर्तता करेल, असा विश्‍वासही सहकारमंत्री देशमुख यांनी या वेळी व्यक्त केला.

सहकारमंत्री देशमुख यांच्या परिवारातील सदस्य, नातेवाईक असलेल्या लोकमंगल ऍग्रोवर भांडवली बाजारात सेबीने बंदी घातली आहे. ही बंदी घालत असतानाच 4 हजार 751 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भागधारक म्हणून नोंदवून घेत त्यांच्याकडून 74.82 कोटींचा निधी उभा केला. कंपनी कायद्याचा भंग करून निधी उभारला, निधीचा गैरवापर केला म्हणून सेबीने ही कारवाई केली आहे. लोकमंगलने एप्रिल 2009 पासून दहा टक्के व्याजदराने पैसे परत करण्याचा प्रस्ताव सेबी पुढे ठेवला होता. सेबीने हा प्रस्ताव अमान्य करत भागधारकांना 15 टक्के व्याजदराने पैसे परत करण्याचा आदेश दिला आहे.

Web Title: lokmangal depositor money return subhash deshmukh