लोकमंगल दूध भुकटी प्रकल्प रद्द 

लोकमंगल दूध भुकटी प्रकल्प रद्द 

सोलापूर - लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीचा दूध भुकटी प्रकल्प शासनाने रद्द केला आहे. हा प्रकल्प रद्द करत असताना शासनाने लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीला आवश्‍यकतेनुसार वैध कागदपत्रांसह नव्याने प्रस्ताव सादर करण्यास मुभा दिली आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत एक लाख लिटर दुग्धशाळेचे विस्तारीकरण व 10 मेट्रिक टन दूध भुकटी प्रकल्प सुरू करण्यास शासनाने लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीला मान्यता दिली होती. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूदही केली होती. हा निधी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व लोकमंगल मल्टिस्टेटच्या संयुक्त खात्यामध्ये जमा केला होता. मात्र, याबाबत सोलापूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी कृषी समिती सभापती अप्पाराव कोरे यांनी तक्रार केली होती. त्याचबरोबर याबाबत मुंबई येथे कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही पत्रकार परिषद घेऊन याबाबत तक्रार केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com