सोलापुरात ‘लोकमंगल’ प्रकरणी मंत्री देशमुख यांच्या चिरंजीवासह नऊ जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सांगली - सांगलीचे पालकमंत्री म्हणून पुरेसे  वेळ देऊ शकत नसल्याने चर्चेत असलेले सुभाष देशमुख पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले  आहेत. सोलापूर या त्यांच्या गृहमैदानात लोकमंगल सोसायटीच्या दूध भुकटी प्रकल्प उभारणीत बनावट कागदपत्र जोडल्याप्रकरणी त्यांच्या मुलासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर भाजपमधील अंतर्गत संघर्ष आणि ‘लोकमंगल’चे शुक्‍लकाष्ट यामुळे सुभाषबापू सांगलीसाठी वेळ देणार कसा, हा सांगलीकरांना प्रश्‍न पडला आहे. 

देशमुख यांचे चिरंजीव रोहन अध्यक्ष असलेल्या बीबीदारफळ येथील दूध भुकटी प्रकल्पाच्या उभारणीसाठी बनावट कागदपत्रे जोडल्याचे प्रकरण उघडकीस आले. चौकशीत संचालक मंडळावर ठपका ठेवत पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभागाच्या अवर सचिवांच्या आदेशानंतर नऊ संचालकांवर गुन्हा दाखल झाला.

विस्ताराची प्रतीक्षा
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सध्या चर्चा आहे. त्यात जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार, हे निश्‍चित मानले जात  आहे. आमदार शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे स्थानिक पालकमंत्री मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सोलापूर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आप्पाराव कोरे यांनी या प्रकरणाची तक्रार केली होती. दुग्धशाळा विस्तारीकरण, दूध भुकटी प्रकल्प उभारणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, अन्न व औषध विभाग, कारखाना अधिनियम परवाना नोंदणी प्रमाणपत्र अशी कागदपत्रे बनावट तयार केल्याचे उघडकीस आले आहे. त्याद्वारे मंजूर अनुदानापैकी ५० टक्के हिश्‍श्‍याच्या एकूण १२ कोटी ४० लाख ७१५ रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

सुभाष देशमुख सोलापूरच्या राजकीय संघर्षात गुंतले आहेत. तेथील भाजप अंतर्गत कुरघोड्या सतत सुरू असतात. त्यात ‘लोकमंगल’ या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहेत. चिरंजीवाच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांची नजर उस्मानाबाद जिल्ह्यावर आहे. अशा स्थितीत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते न्याय देऊ शकतील का, असा सवाल त्यांच्याकडे जबाबदारी दिल्यापासूनच केला जात होता. 

Web Title: Lokmangal society Milk Powder project issue