Loksabha 2019 :  धामणी खोऱ्यातील अठरा गावांचा मतदानावर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

पणुत्रे - कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील धामणी खोऱ्यातील अठरा गावातील मतदारांनी मतदानांवर बहिष्कार टाकला. त्यामुळे या गावांतील मतदान केंद्रावर दिवसभर शुकशकाट आहे. तर आधी जाहीर केलेल्या सात गावांतील ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेत मतदानाचा हक्क बजावला.

तीन तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या धामणी प्रकल्पाचे काम वीस वर्षापासून रेंगाळले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी धामणी धरण कृती समितीने लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत पन्हाळा तालुक्यातील वेतवडे, अंबर्डे ,हरपवडे , निवाचीवाडी , पनोरे, बळपवाडी, राधानगरी तालुक्यातील गवशी , कोनोली , म्हासुर्ली ,सावंतवाडी तर गगनबावडा तालुक्यातील कडवे, बावली, गारीवडे, जरगी, शेळोशी ,खेरिवडे ,धुंदवडे या 18 गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे दिवसभर या गावातील मतदान केंद्रावर शुकशुकाट होता .

या निर्णयामुळे सुमारे ३० हजार मतदार मतदानापासून वंचित राहिले आहे. आधी जाहीर केलेल्या पन्हाळा तालुक्यातील कोदवडे, आकुर्डे , सुळे ,वाघुर्डे,पणुत्रे व राधानगरी तालुक्यातील चौके मानबेट या गावातील ग्रामस्थांनी  मतदानावर बहिष्कार मागे घेत मतदान केले .मात्र या गावात मतदारांचा प्रतिसाद कमी आहे. कृती समितीने बहिष्कार यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

Web Title: Loksabha 2019 Boycott voting in eighteen villages in Dhanani valley