Loksabha 2019 : पाच बैलगाड्या, पाच ट्रॅक्‍टर... हजारो लोक

Raju-Shetty
Raju-Shetty

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता. २८) दाखल करण्यात येणार आहे. संघटना व मित्रपक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येईल. दसरा चौकातून हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडीने जाऊन खासदार शेट्टी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरणार आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांचे सर्व नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी १२ ते २ या वेळेत हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. दसरा चौकातून हजारो लोक रॅलीने अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावे, यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे. अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक सर्व ती कागदपत्रे, परवानग्या, दाखले, निमंत्रण पत्रिका, डिजिटल बॅनर तयार करण्यासाठी संघटनेच्या कोल्हापूर कार्यालयात लगबग सुरू आहे.अर्ज दाखल करण्यासाठी किमान ५० हजार लोक उपस्थित राहतील, याचे नियोजन सुरू आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस रमेश भोजकर म्हणाले, संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हॅट्ट्रिकसाठी अर्ज दाखल करत आहेत. गुरुवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो लोक येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. उद्या (ता. २७) काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com