Loksabha 2019 : स्वाभिमानीने कारखाने विकून खाल्लेल्यानाच दिले तिकीट - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

सांगली -  येथे स्वाभिमानीने कारखाने विकून खाल्लेल्यानाच तिकीट दिले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. येथील स्टेशन चौकात त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली.

सांगली -  येथे स्वाभिमानीने कारखाने विकून खाल्लेल्यानाच तिकीट दिले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

येथील स्टेशन चौकात त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. खासदार राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे शेळ्यांच्या कळपाची जबाबदारी कोल्ह्याला देण्यासारखे आहे, अशी टिकाही मुख्यमंत्र्यांनी केली. 

श्री फडणवीस म्हणाले,"" कॉंग्रेसची न्याय योजना म्हणजे तुम्ही मला एक कोंबडी द्या. तिला पिले होतील. मग ती अंडी घालतील. मग ती अंडी मी तुम्हाला देईन असे म्हटल्यासारखे आहे. पत्रकारांनी जेव्हा त्यांना तुम्ही या 72 हजारांसाठी कोठून पैसे आणणार असे आश्‍वासन दिले तेव्हा ते चिदंबरम्‌ यांच्याकडे पाहू लागले. त्यांनी मग आधीचे पैसे, नंतरचे येणारे पैसे असे गणित घालायचा प्रयत्न केला, असे काही होत नसते.'' 

ते म्हणाले,"" आयुष्यभर शरद पवार यांना शिव्या देणारे राजू शेट्टी आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. पवारांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आणून देणारे शेट्टी आता शेतकरी कल्याण पवारांकडून होईल असे सांगतात. गेली पन्नास वर्षे पवार शेतकऱ्यांचे शोषण करीत आहेत. त्यांच्याकडून आता शेतकऱ्यांच्या कल्याणाची अपेक्षा म्हणजे मेंढ्याच्या कळपाची जबाबदारी कोल्ह्याकडे देण्यासारखे आहे.''

Web Title: Loksabha 2019 Devendra Fadnvis comment