Loksabha 2019: प्रकाश आंबेडकर आणि समाधान आवताडेचे भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

हुकूम मुलाणी
शनिवार, 13 एप्रिल 2019

मंगळवेढा - बहुजन वंचित विकास आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार अॅड प्रकाश आंबेडकर यांनी आज दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडेची यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून, त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे तालुकावासीयाचे लक्ष लागले आहे. त्याच्या भुमिकेकडे राजकीय निरीक्षक लक्ष ठेवून आहेत दरम्यान त्यांचे चुलते बबनराव आवताडे व इतरांनी कालच भाजपात प्रवेश करून पाठिंबा दिलेला आहे.

तालुक्यातील सहकारामध्ये एकहाती वर्चस्व आवताडे गटाचे असून त्याची भुमिका कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाची ठरते. सहकाराती वर्चस्वानंतर आवताडे गटानी यांनी अलीकडच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेचे सह तालुक्यातील प्रमुख सहकारी संस्थेवर त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांना गट बांधणी प्रभावीपणे करता येवू लागली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे शिवसेनेचे उमेदवार होते. कमी प्रभाव असलेल्या या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये त्यांनी चाळीस हजारांपेक्षा अधिक मतदान घेवून शिवसेनेमध्ये आपले स्थान भक्कम केले. अशा परिस्थितीत अलीकडच्या काळामध्ये ते सध्या विधानसभेचे दावेदार समजले जात आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी तालुक्यामध्ये वेगाने गती घेत असताना तालुक्यांमधील प्रमुख राजकीय नेत्यांच्या हालचालीवर राजकीय निरीक्षक आपले मत व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत काल जि.म.बॅक संचालक बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, सोमनाथ आवताडे, सभापती प्रदीप खांडेकर, जि.प.सदस्य दिलीप चव्हाण, उपसभापती विमल पाटील, यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपाचे उमेदवार महास्वामी यांना एक भक्कम आधार निर्माण झाला असतानाच आज अॅड प्रकाश आंबेडकर यांनी तालुक्यामध्ये अनेकांच्या भेटी घेतल्या त्यामध्ये आवताडे समर्थक समाज कल्याण सभापती शीला शिवशरण यांच्या भालेवाडी येथील निवासस्थानी भेट दिली आहे. त्याचबरोबर दामाजी कारखान्याचे अध्यक्ष मदन व त्यांच्या कार्यालयात भेट देऊन त्यांचा सत्कार स्वीकारला आहे. आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

यावेळी सभापती प्रदीप खांडेकर चंद्रकांत पडवळे, लक्ष्मण गायकवाड, सोलापूरचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, धनाजी सरवदे, विनायक यादव आदी उपस्थित होते त्यामुळे यापुढील काळात समाधान आवताडे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, निवडणुकीत वंचीत आघाडी उतरल्याने आवताडेच्या यांचे ग्रामीण भागातील काही समर्थकानी बहुजन वंचित आघाडीचे समर्थन करत असल्याची चर्चा असल्याने समाधान आवताडेची भुमिका आता निर्णायक वळणावर आली.

Web Title: Loksabha 2019: Discussion in the political circles of Prakash Ambedkar and samadhan aawtade meeting