Election Results : राजू शेट्टींनी काशीला जावे - सदाभाऊ खोत

Election Results : राजू शेट्टींनी काशीला जावे - सदाभाऊ खोत

इस्लामपूर - शिवसेना-भाजपच्या बाजूने गेलो म्हणून राजू शेट्टी यांनी पुण्यातील फुलेवाडा ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा केली. आता तर शेट्टी यांना पंचगंगेत अंघोळ करून काशीला गंगेत स्नान करावे. त्यांनी आत्मक्‍लेश म्हणून काशीला जावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.  

सरकारमध्ये जावून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्याची संधी असताना शेट्टीं विरोधात राहीले. एका अर्थाने त्यांनी शेतकऱ्यांना फसवले. म्हणूनच त्यांचा पराभव झाला, असेही श्री. खोत म्हणाले. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांचा दारुण पराभव झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. खोत म्हणाले, ""राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे चालवलेली चळवळ आत्मकेंद्री केली होती. त्यांना "मी'ची बाधा झाली होती. मी म्हणजे परमेश्‍वराने शेतकऱ्यांच्या हितासाठी पाठवलेला प्रेषित आहे, असेच त्यांना वाटत होते. लोकांसमोर भावनिक बोलून खुर्ची टिकविणे यात ते माहीर असल्याने त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना जीवनातून उठविले. स्वतःचाच विचार करून त्यांनी सर्वकाही आपल्याभोवती फिरले पाहिजे, अशी यंत्रणा चळवळीत लावली होती.

धैर्यशील मानेंचा विजय हा कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी व काळ्या आईला आम्ही अर्पण करतो. या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी झुकते माप देऊन विकासकामांना मोठा निधी उपलब्ध करून दिला. विकासकामांतून आम्ही लोकांचा विश्‍वास संपादन करू शकलो.

- सदाभाऊ खोत

नानासाहेब महाडिक नसल्याची सल

चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हळवणकर या बरोबरच शिवसेनेचे या मतदारसंघातील सर्व आमदार, वाळवा तालुका शिवसेना, भाजप, महाडिक, हुतात्मा गट व इतर सर्व नेतेमंडळींनी मोठे परिश्रम घेतले. तरुण पिढीने ही निवडणूक हातात घेतल्याने विजय सोपा झाला. वाळवा तालुक्‍यातील आमचे सेनापती वनश्री (कै.) नानासाहेब महाडिक आज हा विजय साजरा करण्यासाठी नसल्याची सल मनात आहे. त्यांच्या इतका प्रचंड आत्मविश्‍वासू व्यक्ती मी पाहिला नाही. नानासाहेब महाडिक यांनी सर्वांची मोट बांधत वाळवा-शिराळा तालुक्‍यात धैर्यशील मानेंना मोठा हातभार लावला.''  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com