Election Results : बारामतीत सुळे जिंकल्याने देशातील इव्हीएम बरोबरच - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 May 2019

कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य अभुतपूर्व आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निकालावर दिली. बारामतीत सुप्रिया सुळे जिंकल्याने आता देशातील ईव्हीएम बरोबरच असतील, असा टोलाही त्यांनी लगावला. 

कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य अभुतपूर्व आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निकालावर दिली. बारामतीत सुप्रिया सुळे जिंकल्याने आता देशातील ईव्हीएम बरोबरच असतील, असा टोलाही त्यांनी लगावला. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल अंतिम टप्प्यात आल्यानंतर श्री. पाटील यांनी भाजपच्या बिंदू चौक कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य माणसाचे जीवन आनंदी, सुखी आणि सुरक्षित केले. त्यामुळे जनतेच्या मानत जे होते, त्याच प्रकारचे निकाल लागले आहेत. हे यश आम्हाला अपेक्षित होते; मात्र कोल्हापुरात आम्हाला प्रचंड यश मिळाले. कोल्हापूरच्या जनतेचा मी आभारी आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात शिरूर, बारामती, सातारा येथील आमची गणिते जरा चुकली; पण बारामतीमध्ये पवारांच्या मनातील हुरहूर हा आमचा एक प्रकारचा विजयच आहे. कारण पूर्वी शरद पवार बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज भरायचे आणि प्रचाराला राज्यभर जायचे. कारण त्यांना विजयाची खात्री असायची. मात्र यावेळी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपर्यंत त्यांना विजयाची खात्री नव्हती. त्यांच्या मनात प्रत्येक क्षणी जी हुरहुर होती, हाच आमचा विजय आहे.'' 

राजू शेट्टींच्या पराभवाबद्दल ते म्हणाले, ""राजू शेट्टी यांचा पराभव त्यांच्या उद्दामपणामुळे झाला. त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान या सर्वोच्च पदावरील व्यक्तींबद्दल चुकीची वक्तव्ये केली. जनतेच्या मनात या पदांबद्दल आदर आहे. जनतेच्या मनात काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल रोष होता. ज्यांना शेट्टींनी विरोध केला आज ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले. हे जनतेला पटले नाही. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. विधानसभेलादेखील महायुतीमधील प्रत्येक पक्षाला बरोबर घेऊन आम्ही सामोरे जावू आणि प्रचंड मताधिक्‍य घेऊन पुन्हा सत्ता प्रस्थापित करू.'' 

यावेळी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई उपस्थित होते. 

पवारांच्या घरी चहा पिणार 
चंद्रकांत पाटील म्हणाले, ""इथून पुढे दर पंधरा दिवसांनी बारामतीमध्ये जाणार. तेथील जनतेच्या समस्या सोडवणार. निवडणुकीमध्ये ज्यांना जे आश्‍वासन दिले ते पूर्ण करणार. निवडणुकीत पवार विरोधक होते. आता निवडणूक संपली. त्यामुळे आता बारामतीत चहा प्यायला त्यांच्या घरीच जाणार. ते नाही म्हणणार नाहीत.'' 

अमल महाडिक...वेट अँड वॉच 
महाडिकांबद्दल पाटील म्हणाले, "निवडणूक ही तात्कालिक असते पण मैत्री कायम असते. त्यामुळे महाडिक कुटुंबाबरोबरची माझी मैत्री कायम आहे. यावळी त्यांना अमल महाडिक यांच्या उमेदवारीबद्दल विचारले असता ते वेट अँड वॉच म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Election Results Minister Chandrakant Patil comment