Loksabha 2019 : शेट्टींकडून अर्ज भरण्यास चार लाख खर्च

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक अर्ज भरण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी दुचाकी आणि चारचाकी, स्पीकर, स्टेज, मंडप आणि अनामत रकमेसह एकूण ४ लाख रुपये खर्च केल्याची नोंद निवडणूक खर्च तपासणी पथकाने केली आहे. यात ज्या बैलगाडीतून राजू शेट्टी, माजी मंत्री जयंत पाटील अर्ज भरण्यास आले होते, त्या बैलगाडीसाठी दिवसासाठी ५०० रुपये खर्च केल्याचीही नोंद आहे.

आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवाराने दैनंदिन खर्च हा निवडणूक विभागाने दिलेल्या खर्चाच्या वहीत लिहावा लागणार आहे. हा खर्च तपासणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून तपासून घ्यावा लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार शेट्टी यांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला.

दरम्यान, खर्च तपासणी पथकानुसार शेट्टी यांच्या मिरवणुकीसाठी सुमारे १५० दुचाकी वाहने वापरली आहेत. प्रत्येक वाहनावर १ हजार रुपये खर्च झाला आहे. एकूण वाहनांसाठी १ लाख ५० हजारांचा खर्च झाल्याची नोंद आहे. शिवाय, २० वेगवेगळ्या कंपनीच्या चारचाकी वाहनांचा वापर झाला आहे. कंपनी आणि क्षमतेनुसार प्रत्येक वाहनाचा ३००० ते ३६०० रुपयांपर्यंत खर्चाची नोंद झाली आहे. तसेच, रॅली, स्टिकर, बॅनर, झेंडे, मफलर, टोप्या हा खर्च आहे. हा खर्च नंतर दिला जाणार आहे. 

शेट्टींकडून रॅलीचा खर्च ५० हजार रुपयांपर्यंत दिला होता. दरम्यान, शासकीय यंत्रणेकडून किंवा खर्च निरीक्षकांकडून रॅलीचे व्हिडिओ, फोटो तसेच लोकांची गर्दी, त्यांनी वापरलेली दुचाकी, चारचाकी वाहने, झेंडे, मफलर, बॅनर पाहून चार लाख रुपये खर्च झाल्याची नोंद केली आहे.

उमेदवाराला ७० लाख मर्यादा 
उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत प्रत्येक इच्छुक उमेदवाराला ७० लाख खर्च करता येणार आहेत. हा खर्च केवळ उमेदवार सांगतो, तोच गृहीत धरला जाणार नाही, तर खर्च निरीक्षक अधिकाऱ्यांकडून ज्या-त्या सभांची, प्रचार, रॅलीची माहिती व व्हिडिओ पाहून ठरविला जाणार आहे.

मिरवणुकीसाठी 

  •     १५० दुचाकी वाहने :     प्रत्येकी १ हजार खर्च
  •     २० वेगवेगळ्या कंपनीची वाहने : खर्च प्रत्येकी ३००० ते ३६००
  •     वाहनांसाठी एकूण खर्च :     १ लाख ५० हजार
Web Title: Loksabha 2019 : Four lakhs spent in filling forms from Shetti