Loksabha 2019 : मोदींनी प्रचाराचा निच्चांक गाठला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

तासगाव - भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारात निच्चांकी पातळी गाठली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच त्यांची अशी अवस्था असेल तर पुढच्या पाच टप्प्यात ते आणखी किती खाली येणार आहेत. हे आम्हाला पहायचे आहे, अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केली.

स्वाभामानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.  ते म्हणाले,"" नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी प्रचाराची पातळी सोडली आहे. खरे तर त्यांनी पाच वर्षातील विकास आणि काय करणार यावर बोलायला हवे होते. व्यक्तिगत पातळीवर पंतप्रधानांनी जायला नको. ते असे भाषण करणारे हे पहिलेच पंतप्रधान आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हे खाली आले आहेत अजून पाच टप्पे आहेत आणखी किती खाली उतरणार.'' 

ते म्हणाले,"" देशाची हवा बदलत आहे. खुद्द नागपूरमध्ये नितीन गडकरींचा पराभव होऊ शकतो. देशाची हवा बदलत आहे. बहुजन वंचित आघाडीला मत देणे म्हणजे भाजपला मदत केल्यासारखे आहे. आताची भाजप काय आहे हे परवा अंमळनेरला पाहिले आहे. ही नवी भाजप आहे. मंत्र्याच्या समोरच हाणामाऱ्या सुरू आहेत.'" 

लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजय पाटील यांचे नाव न घेता जयंत पाटील यांनी पाच वर्षात जिल्ह्यातील कोणता मोठा प्रश्न सोडवला हे एकदा सांगावे. आता लोकसभेसाठी चेहरा बदलण्याची आवश्‍यकता असल्याचे ठासून सांगितले. 

Web Title: Loksabha 2019 Jayant Patil comment