Loksabha 2019 : कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघातून एकूण ४८ उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

कोल्हापूर -  कोणी शक्तिप्रदर्शन करीत, कोणी साधेपणाने, कोण घोड्यावरून, कोण ट्रॅक्‍टरवरून, तर कोण शितोंडी घेऊन कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज अखेरच्या दिवशी ४८ उमेदवारांचे ६८ अर्ज दाखल केले आहेत. यात कोल्हापूरमधील २५ उमेदवारांनी ३७, तर हातकणंगलेमधील २३ उमेदवारांनी ३१ अर्ज दाखल केले आहेत. 

कोल्हापूर -  कोणी शक्तिप्रदर्शन करीत, कोणी साधेपणाने, कोण घोड्यावरून, कोण ट्रॅक्‍टरवरून, तर कोण शितोंडी घेऊन कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज अखेरच्या दिवशी ४८ उमेदवारांचे ६८ अर्ज दाखल केले आहेत. यात कोल्हापूरमधील २५ उमेदवारांनी ३७, तर हातकणंगलेमधील २३ उमेदवारांनी ३१ अर्ज दाखल केले आहेत. 

उद्या (ता. ५) सकाळी अकरापासून अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर, सोमवारी (ता. ८) अर्ज मागे घेतले जातील. त्यानंतर याच दिवशी दुपारी ज्या-त्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चिन्हवाटप होईल. 

आज दाखल केलेल्यांमध्ये भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती, बहुजन महापार्टी, बहुजन समाज पक्ष यासह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत चांगलाच रंग भरणार आहे. दरम्यान, उद्या सकाळी अकरापासून अर्जांची छाननी होईल. तर, २३ एप्रिलला मतदान होणार असून, २४ मेस मतमोजणी होणार आहे. 

अर्ज छाननीसाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाने काळजीपूर्वक नियोजन केले आहे. अर्जांची तपासणी आणि योग्य माहिती भरून घेण्याचे काम केले. ज्या-ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, किंवा त्यांनी सादर केलेली माहिती चुकीची आहे. असे वाटत असेल तर एखाद्या व्यक्तीला त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्र किंवा खर्चाच्या विवरणावर आक्षेप घेता येईल. ज्याने आक्षेप घेतला आहे, त्याची तक्रारही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जाहीर केली जाईल. तसेच, दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा प्रशासन यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे हा अर्ज पाठवतील. 

चौकशी असेल प्रक्रिया
- अर्ज छाननी : शुक्रवार (ता. ५)पासून
- अर्ज माघार : सोमवारी (ता. ८) दुपारपर्यंत 
- चिन्हवाटप : सोमवारी (ता. ८) दुपारनंतर
- मतदान  : २३ एप्रिल  
- मतमोजणी  : २४ मे

भरलेले अर्ज :
लोकसभा मतदारसंघ*           उमेदवार*           भरलेले अर्ज
कोल्हापूर*                         २५*                   ३७
हातकणंगले*                       २३*                   ३१

Web Title: Loksabha 2019 Kolhapur Hatkanangale Lok Sabha Constituency