Loksabha 2019 : कोल्हापूरमधून प्रा. संजय मंडलिक यांचा अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

कोल्हापूर - महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी आज मिरवणूकीने अर्ज दाखल केला. जयलक्ष्मी सभागृह ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक निघाली. मंडलिक यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. 

कोल्हापूर - महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी आज मिरवणूकीने अर्ज दाखल केला. जयलक्ष्मी सभागृह ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक निघाली. मंडलिक यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. 

मिरवणुकीचे अंतर कमी असले तरी कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह मिरवणुकीचे वैशिष्टय ठरले. जयलक्ष्मी सभागृहामध्ये प्रमूख नेत्यांना अभिवादन करून मंडलिक अकराच्या सुमारास अर्ज भरण्यासाठी बाहेर पडले. नेत्यांसह त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा जथ्था होता.

तालुक्‍यातून आलेल्या नेत्यांसोबत मंडलिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. हलगीच्या कडकटामुळे मिरवणूकीत उत्साह संचारला, महावीर गार्डनच्या कोपऱ्याला पोलिसांनी लोखंडी बॅरिकेट टाकून रस्ता अडविला होते. तेथून मोजक्‍या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश देण्यात आला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, महेश जाधव. आमदार राजेश क्षीरसागर, प्रा. शहाजी कांबळे, आमदार प्रकाश आबिटकर यांनी हात उंचावून विजयाची खूण केली. मंत्री पाटील बाहेरूनच त्यांच्या पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. संजय पवार, क्षीरसागर, प्रा. मंडलिक, महेश जाधव यांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यात आला. सुमारे वीस मिनिटांच्या अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेनंतर ते बाहेर आले. 

महावीर गार्डनमध्ये युतीचे कार्यकर्ते थांबून होते. तेथे मंडलिक यांनी जाऊन मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. 

आमदार चंद्रदीप नरके, संजय घाटगे. डॉ. प्रकाश शहापूरकर, समरजितसिंह घाटगे, बाळासाहेब कुपेकर. अशोक चराटी, बी. एस. देसाई.हिंदुराव शेळके, सदाशिव चरापले संग्रामसिंह कुपेकर, आदि उपस्थित होते. 

निवडणूक जनतेने हाती घेतली 
ही निवडणूक जनतेने हाती घेतल्याचे प्रा. मंडलिक यांनी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आपण सर्वपक्षीय उमेदवार असून जनभावना ध्यानात घेऊन साधेरपणाने अर्ज भरल्याचे नमूद केले. 
 

Web Title: Loksabha 2019 Kolhapur Lok Sabha Constituency Prof Sanjay Mandlik fill form