Loksabha 2019 : अजितदादांचा ‘खिसा’ पाहून आमचा गडी आघाडीत गेला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

किल्लेमच्छिंद्रगड - अजितदादा पवारांनी खिसा झाडला, तर राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होईल’, असे बोलणारा आमचा गडी त्यांचा खिसा पाहून त्यांच्या आघाडीत गेला आहे, असा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर त्यांचे नाव न घेता केला.

हातकणंगले मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. बाबुराव पाटील अध्यक्षस्थानी होते.

मंत्री खोत म्हणाले,‘‘वसंतदादा पाटील काँग्रेस पक्षाचे संस्थापक परंतु त्यांच्याही घराण्यात सत्तेसाठी राजू शेट्टींनी फूट पाडली.’’

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले,‘‘खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या दहा वर्षांत संसदेत शेतकऱ्यांचा एकही प्रश्न  मांडला नाही.’’

उमेदवार धैर्यशील माने म्हणाले, ‘‘जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू.’’ यावेळी आ. शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक, सागर खोत, वैभव शिंदे, विक्रम पाटील, शरद पाटील, रावसाहेब पाटील, सुरेखा मटकरी, वैभव शिंदे यांची भाषणे झाली. आमदार उल्हासराव पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, अभिजित पाटील, प्रसाद पाटील, प्रताप पाटील, दि. बा. पाटील, विक्रम पाटील, चंद्रकांत पाटील, भास्कर पाटील उपस्थित होते.

Web Title: Loksabha 2019 Sadabhau Khot comment