...तर सुमनताईंसमोर धर्मसंकट

...तर सुमनताईंसमोर धर्मसंकट

तासगाव - गेल्या लोकसभा निवडणुकीत घरचा उमेदवार म्हणून खासदार संजय पाटील यांना तालुक्‍यातील आबा गटाचाही पाठिंबा मिळाला होता. मोदी लाटेत मिळालेल्या यशाची तालुक्‍यात पुनरावृत्ती करणे खासदारांसाठी आता बिकट आव्हान असेल. कारण, आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. तालुक्‍यातील ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते सध्या सावध भूमिकेत आहेत. 

गेल्या वेळी दिवंगत आर. आर. यांनी मी निवडणुकीला उभा आहे, असे आवाहन करीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार प्रतीक पाटील यांना मतदानासाठी खिंड लढवली होती. तथापि राष्ट्रवादीत सहा वर्षे राहिल्याने संजय पाटील यांच्या वाढलेल्या व्यक्तिगत संबंधातून आणि थेट आबांची निवडणूक नसल्याने राष्ट्रवादीतील काही दिग्गजही त्यावेळी संजय पाटील यांच्यासोबत राहिल्याचे निवडणुकीनंतर स्पष्ट झाले होते. यावेळीही आमदार सुमन पाटील यांच्यासमोर धर्मसंकट असेल. आघाडीधर्माचे पालन करायचे का बंडखोरी केल्यास विशाल पाटील यांच्यासोबत रहायचे याचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा थेट उमेदवार नाही, आघाडीतील म्हणावे तर काँग्रेसने मतदारसंघच सोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देऊन टाकला आहे. त्यांचाही थेट संबंध नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत खलबते सुरू आहेत. 
तथापि विशाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी हजेरी लावून आपली दिशा स्पष्ट केली आहे. 

आबा गटाचे वसंतदादा कुटुंबाशी असलेला स्नेहबंध पाहता या गटाचा कल तिकडे असेलच. मात्र काही कुंपणावरील कार्यकर्त्यांनी पक्षाचा गटाच्या आदेशाची वाट न पाहता ‘वाऱ्या’ची दिशा बघून आतापासूनच लोकसभेसाठी काका आणि विधानसभेसाठी आबा अशी भूमिका ठेवल्याचे चित्र आहे. राहिला विषय आघाडी धर्माचा. ती जबाबदारी केवळ आमदार सुमन पाटील यांच्याकडून पाळली जाईल असे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com