Loksabha 2019 : शक्तीप्रदर्शनाने पडळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

सांगली -  सांगली लोकसभा मतदार संघासाठी बहुजन वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी आज उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शनाने दाखल केला. श्री. पडळकर यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे उमेदवारी दाखल केली. 

बहुजन वंचित आघाडीचे सांगली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील समाजातील प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी बहुजन वंचित आघाडीचे नामदेव करगणे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयसिंग शेंडगे, एमआयएमचे पिरजादे, सचिन माळी, बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत शेजाळ, सुहास माळी उपस्थित होते. पिवळा, हिरवा आणि भगवे ध्वज घेवून कार्यकर्ते जल्लोश साजरा करीत होते. 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्री. पडळकर म्हणाले,"" घराणेशाहीच्या अंताची ही निवडणुक आहे. संजय पाटील आणि विशाल पाटील एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या दोघांचे राजकीय प्रतिष्ठेसाठी भांडण सुरु आहे. सांगलीच्या खासदारांची गुंडगिरीच सुरु आहे. जिल्ह्याच्या विकासाऐवजी प्रशासनाला हाताशी धरुन गुंडगिरी सुरु केली आहे. जे अधिकारी ऐकणार नाहीत. त्यांना बदलीला समोरे जावे लागते आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना माझा पाठिंबा राहिल. '' 

Web Title: Loksabha 2019 Sangli Lok Sabha Constituency Gopichand Padalkar fill form