Loksabha 2019 : धामणी खोऱ्यातील सात गावच्या ग्रामस्थांनी केले मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

कोल्हापूर - धामणी खोऱ्यातील सात गावांनी लोकसभा मतदानावर   बहिष्कार घातला होता. तो घोषित केलेला बहिष्कार मागे घेवून  मतदानाचा पवित्र हक्क त्यांनी बजावला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 

धामणी खोऱ्यातील काही गावांनी विविध प्रश्नांसह पाण्याच्या मुद्द्यावरून मतदानावर बहिष्कार घोषित केला होता. तथापी पन्हाळा तालुक्यतील कोदवडे, आकुर्डे, सुळे, वाघुर्डे, पनोत्रे आणि राधानगरी तालुक्यातील माणबेट आणि चौके या गावातील गावकऱ्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेवून मतदानाचा पवित्र हक्क बजावला. 

Web Title: Loksabha 2019 Seven villages in Dhamani valley done voting