Loksabha 2019 : वसंतदादांचा पणतू हर्षवर्धन राजकीय मैदानात ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

एक नजर

  • काँग्रेसचे माजी मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन राजकारणात
  • विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी हर्षवर्धन उतरले मैदानात
  • माजी मुख्यमंत्री वसंतदादांच्या घराण्यातील चौथी पिढी आता राजकारणात सक्रीय
  • बेडग येथील पदयात्रेत हर्षवर्धन सहभागी

सांगली - काँग्रेसचे माजी मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन हे विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री वसंतदादांच्या घराण्यातील चौथी पिढी आता राजकारणात सक्रीय झाली आहे. बेडग येथील पदयात्रेत हर्षवर्धन सहभागी झाले. 

चारवेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू यांनी सहावेळा खासदारकी पटकावली. त्यांच्या पश्‍चात दादांचे नातू प्रतीक दोन वेळा खासदार एकदा केंद्रीय राज्यमंत्री झाले. प्रतीक यांचे धाकटे बंधू विशाल सध्या लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारात प्रतिक यांचे पुत्र हर्षवर्धन सक्रिय झाले आहेत. या निमित्ताने राजकीय क्षेत्रात उतरण्यास ते सज्ज झाले आहेत.

बेडग (ता. मिरज) येथे निघालेल्या पदयात्रेत हर्षवर्धन यांचा सहभाग होता. धनगरी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. युवा नेतृत्व हर्षवर्धन यांच्याबद्दल तरुणांमध्ये उत्सुकता होती. हर्षवर्धन यांनी यावेळी गावातील वृध्दांना नमस्कार करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. तरुणांना आणि ग्रामस्थांना स्वाभिमानीला विजयी करण्याचे आवाहन केले. 

यावेळी राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे, माजी सभापती दिलीप बुरसे, मोहनराव शिंदे, ज्येष्ठ नेते संभाजी पाटील, अॅड. अमित शिंदे, अमरसिंह पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते बाळासाहेब ओमासे, संभाजी पाटील, बेडग ग्र्रामपंचायत सदस्य विष्णु पाटील, कैलास पाटील, डॉ.नामदेव कस्तुरे, बाळसाहेब नलावडे, रंगराव दादा पाटील, भारत चौगुले आदी सहभागी झाले होते.

Web Title: Loksabha 2019 Vasantdada Patil Grandchild Harshvardhan in Politics