...तर चंद्रकांत पाटील कोल्‍हापुरातून लढणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

भाजपने तसा निर्णय घेतला तर पालकमंत्री पाटील यांना कोल्‍हापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याशी लढत द्यावी लागेल; पण आजघडीला श्री. पाटील यांचा ओढा श्री. महाडिक यांच्याकडे आहे. त्यातूनच युती झाली तरी श्री. महाडिक यांना मदत करू, असे सूतोवाच पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्यामुळे या घडामोडींबाबत साऱ्यांना उत्सुकता आहे.

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकारमंत्री सुभाष देशमुख, कल्याणमधून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकसभेसाठी आवर्जून उमेदवारी द्यावी, असा आग्रह भाजपमधूनच सुरू आहे. त्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. भाजपने तसा निर्णय घेतला तर पालकमंत्री पाटील यांना कोल्‍हापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याशी लढत द्यावी लागेल; पण आजघडीला श्री. पाटील यांचा ओढा श्री. महाडिक यांच्याकडे आहे. त्यातूनच युती झाली तरी श्री. महाडिक यांना मदत करू, असे सूतोवाच पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्यामुळे या घडामोडींबाबत साऱ्यांना उत्सुकता आहे.

Web Title: Loksabha Election Chandkarant Patil candidate from Kolhapur