पावसकरांच्या चर्चेने जाधवांची नाराजी

Purushottam-Jadhav
Purushottam-Jadhav

सातारा - लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारीला लागलेले भाजपचे नेते पुरुषोत्तम जाधव यांचे नाव मागे पडून त्यांच्याऐवजी विक्रम पावसकरांचे नाव कार्यकर्त्यांतून पुढे आले आहे. त्यामुळे श्री. जाधव नाराज झाले असून, त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांपासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंपर्यंत मांडण्याची तयारी केली आहे. 

खंडाळ्याचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवसापासून सातारा लोकसभा निवडणूक लढायचीच, या उद्देशाने संपर्क मोहीम सुरू ठेवली होती. पण, याबाबत त्यांना जिल्ह्यातील पक्षसंघटनेतील पदाधिकाऱ्यांची फारशी साथ मिळाली नाही. तरीही त्यांनी गेल्या दोन वर्षांत सातारा लोकसभा मतदारसंघात चांगलेच रान उठविले होते. हा मतदारसंघ युतीच्या वाटणीत शिवसेनेकडे होता. त्यांनी तो रिपब्लिकन पक्षाला दिला होता. यावेळेस युती होईल किंवा नाही, याबाबत अद्याप तरी स्पष्ट नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र स्वबळाची तयारी सुरू आहे. शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नाही, तर भाजपने अद्यापर्यंत तरी कोणाच्या नावाला दुजोरा दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले होते.

यातूनही भाजपमध्ये असूनही पुरुषोत्तम जाधव यांनी सातारा लोकसभा लढायची आणि यावेळेस यश मिळेल, या आशेवर काम सुरू ठेवले होते. त्यांनी मतदारसंघात ‘संपर्क फॉर समर्थन’ही सुरू ठेवले होते. त्यानंतर प्रो-कुस्ती स्पर्धेत त्यांनी ‘यशवंत सातारा या टीम’ची मालकी घेतली होती.

त्यातून त्यांचे नाव राज्य नव्हेत तर देशपातळीवर पोचले. याच कालावधीत त्यांचे मतदारसंघाकडे थोडे दुर्लक्ष झाले अन्‌ भाजपकडून विक्रम पावसकर यांचे नाव पुढे आले आहे. त्यांनाही युतीबाबत साशंकता असल्यामुळे ऐनवेळी भाजपच्या नेत्यांनी द्या उमेदवार म्हटल्यास मागे पडून चालणार नाही, म्हणून विक्रम पावसकरांचे नाव कार्यकर्त्यांतून पुढे आले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने संपर्क मोहिमेत असलेले पुरुषोत्तम जाधव मात्र नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंपर्यंत मांडण्याचा निर्णय घेतला आहे. ही मंडळी श्री. जाधव यांना कोणते बाळकडू देणार, यावर त्यांची आगामी वाटचाल अवलंबून आहे, अन्यथा त्यांना दुसरा मार्ग अवलंबावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com