लोणंद - धनगर समाजाचा भव्य मोर्चा
लोणंद - धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावे या मागणीसाठी खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने एकत्र येवून आज (ता. ३) लोणंद येथे अहिल्यादेवी होळकर स्मारकातील अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार घालून लोणंद शहरात शेळ्या- मेंढयासह भव्य मोर्चा काढला.

त्यावेळी मोर्चात जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके- पाटील, माजी उपाध्यक्ष नितीन-भरगुडे, पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते अॅड. बाळासाहेब बागवान, खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे- पाटील, विद्यमान उपसभापती वंदनाताई धायगुडे - पाटील, सदस्या शोभाताई जाधव, लोणंदच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके पाटील, खंडाळयाचा नगराध्यक्षा लताताई नरुटे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, नगरसेवक हणमंतराव शेळके, सचिन शेळके, समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद क्षीरसागर, डॉ. नितीन सावंत, अॅड. सुभाष घाडगे, योगेश क्षीरसागर, रविंद्र क्षीरसागर, राजेंद्र डोइफोडे, अॅड. पी.बी हिंगमिरे, हेमलता कर्नवर, स्वाती भंडलकर, बबनराव शेळके, अशोक धायगुडे, बाळासाहेब शेळके, शिवाजीराव शेळके- पाटील, मस्कुआण्णा शेळके- पाटील ,सर्व स्तरातील समाज बांधव विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने सामिल झाले होते.
लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गिरिश दिघावकर यांनी जलत कृती दलाच्या दोन तुकड्या मागवून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता. बाजारतळावर आल्यावर मोर्चा विसर्जीत झाला.त्यानंतर मोर्चेकरी खंडाळा येथे तहसिल कार्यालयासमोर आयोजीत केलेल्या ठिय्या अंदोलनासाठी रवाना झाले.