लोणंद - रेल्वेच्या शासकीय जागेतील अनाधिकृत झोपड्या हटविल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

लोणंद - लोणंद रेल्वे स्थानकानजीकच्या रेल्वेच्या शासकीय जागेत अनेक वर्षापासून असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील १४० ते १४५ अनाधिकृतपणे झोपड्या आज (ता. ३०) रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस, लोणंद व सातारा शीघ्र कृती पोलिस दलाच्या सहकार्याने मोठया पोलिस बंदोबस्तात हटवल्या.

लोणंद - लोणंद रेल्वे स्थानकानजीकच्या रेल्वेच्या शासकीय जागेत अनेक वर्षापासून असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील १४० ते १४५ अनाधिकृतपणे झोपड्या आज (ता. ३०) रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस, लोणंद व सातारा शीघ्र कृती पोलिस दलाच्या सहकार्याने मोठया पोलिस बंदोबस्तात हटवल्या.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने यापूर्वी येथील अनाधिकृत झोपडपटटी धारकांना आपल्या झोपडया, कच्ची, पक्की बांधकामे काढून घेण्याबाबत नोटीसांद्वारे कळवले होते. तरीही अतिक्रमणे काढून घेण्यात आली नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने चार दिवसापूर्वी पुन्हा नोटीस फलकांवर नोटीस लावून ३० नोव्हेंबर पर्यंत अतिक्रमणे काढून घेण्याबाबतची अंतीम तारीख देवून पोलिस बंदोबस्तात चोख कारवाई करण्याचा रेल्वे प्रशासनाने इशारा झोपडपट्टी धारकांना दिला होता. मात्र त्यानंतरही अतिक्रमणे काढून घेण्यात न आल्याने आज ही कारवाई करण्यात आली. दरम्यान आज सकाळी ही कारवाई सुरू होण्यापूर्वीच झोपडपट्टी धारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढली.

रेल्वेचे अभियंता श्री.शिंदे व सहाय्यक अभियंता योगेंद्रसिंह यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गिरिश दिघावकर, रेल्वे पोलिस दलाचे सत्यजीत आदमाने, रेल्वे सुरक्षा बलाचे रोहितकुमार यांनी आपल्या सहकार्यां समवेत ही कारवाई केली. 

यावेळी लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सचिन शेळके, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके - पाटील, नगरसेवक हणमंत शेळके - पाटील, सागर शेळके यांनी पोलिस प्रशासणाला व रेल्वे प्रशासणाअतिक्रमणे काढून घेण्यासाठी झोपडपट्टी धारकांना काहीसा वेळ देण्याची विनंती केली. त्यावेळी पोलिसांनी अर्धातास वाढवून दिला. यावेळी लोणंदचे मंडलाधिकारी श्री. बोबडे व तलाठी श्रीकांत इटलोड उपस्थीत होते.

Web Title: Lonand - Removed unauthorized slums in government land of Railway