देवदासींचा 5 ऑक्‍टोबर रोजी गडहिंग्लज ते कोल्हापूरपर्यंत लॉंगमार्च

अजित माद्याळे
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

गडहिंग्लज - येथील देवदासी निराधार मुक्ती केंद्राच्या पुढाकाराने 5 ऑक्‍टोबर रोजी विविध मागण्यांसाठी देवदासी, वाघ्या-मुरळी, जोगते, शोषित, विधवा महिला, बेघरांचा गडहिंग्लज ते कोल्हापूर असा लॉंगमार्च काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारण्याचा निर्धार येथील बैठकीत करण्यात आला.

दत्तात्रय मगदूम अध्यक्षस्थानी होते. येथील श्रेष्ठी विद्यालयापासून सकाळी सातपासून या लॉंगमार्चला प्रांरभ होईल. मुक्ती केंद्राच्या वसतीगृह परिसरात ही बैठक झाली. संस्थेचे अध्यक्ष बापू म्हेत्री, उपाध्यक्ष चंद्रकांत ेतेलवेकर, लक्ष्मी सूर्यवंशी, पूनम म्हेत्री, राजू नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

देवदासींसह शोषित महिलांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न शासनाला सोडविता आला नाही. अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत. त्यासाठी आता रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. महाराष्ट्राला कधी नव्हे इतके नाकर्ते सरकार मिळाले आहे. महिलांना हे सरकार सहजासहजी न्याय देणार नाही. यासाठी लॉंग मार्च व धडक मोर्चाचा निर्धार केला आहे. 

-  बापू म्हेत्री

श्री. मगदूम म्हणाले, गेली चार दशके देवदासींच्या मागण्या प्रलंबित आहेत. तरीही शासनाने साधी दखलही घेतली नाही. यामुळे आता सर्व देवदासींनी निर्णायक लढ्यासाठी सज्ज व्हावे

चंद्रकांत तेलवेकर म्हणाले, संवेदना बधीर झालेल्या सरकारला कधी जाग येणार हा प्रश्‍न आहे. आता अंतिम लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे. देवदासी अजूनही यातना भोगत आहेत. 

यावेळी पूनम म्हेत्री, लक्ष्मी सूर्यवंशी, राजू नाईक यांचीही भाषणे झाली. रेखा मांग यांनी स्वागत केले. आप्पासाहेब कांबळे यांनी आभार मानले. धोंडूबाई नाईक, निलकंठ पट्टणशेट्टी, सूरज कांबळे, सुगंधा गुरव, चंदाबाई बारामती, परसू कांबळे, चदर घणके, जानकी कांबळे, मालूताई ताशिलदार, फुलाबाई चिकबसर्गे, शंकर बेळगुंदकर, शिवाजी जाधव, शिवाजी घेवडे, सुनंदा माने, रामा पाटील, विमल पाटील, सूरज पुजारी आदी उपस्थित होते.

मुंबई सोडणार नाही
श्री. म्हेत्री म्हणाले, देवदासींचा संताप आता सहनशीलतेपलिकडे पोहचला आहे. चाळीस वर्षे शासन त्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. हिवाळी अधिवेशनापूर्वी शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर विधानभवनाला घेराव व मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही.

Web Title: Long March of Devdasi on 5th October from Gadhinglaj to Kolhapur