लेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

कराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड शहरापासून जवळच्याच एका अलीशान हॉटेल परिसरात आज दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. कर्नाटकातील विजापूर येथील श्री ज्ञानयोगी शिवकुमार स्वामीजी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना लुटण्यात आले आहे.

त्याबाबत कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. हायवे लगतचे गाव म्हणून कराडमध्ये व्यवहार होणार होता. रक्कम घेवून लंपास झालेले भामटे मुंबईचे आहेत. ते पसार झाल्यानंतर अवघ्या अर्धातासात पोलिसांना जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी नाकाबंदी केली आहे. मात्र सायंकाळपर्यंत चोरट्यांचा माग लागला नव्हता.

Web Title: looted 4.5 crore by sugarcane factory