निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान - हर्षवर्धन पाटील

राजकुमार थोरात
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चार वर्षामध्ये शेतीसाठी पाणी मिळाले नसून, शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्वत:ची निष्क्रियता झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप करणे सुरु केले असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता केली.

वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चार वर्षामध्ये शेतीसाठी पाणी मिळाले नसून, शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्वत:ची निष्क्रियता झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप करणे सुरु केले असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता केली.

रणगाव (ता.इंदापूर) येथे विविध विकासकामे व माजी सरपंच, उपसरपंचाच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी सभापती करणसिंह घोलप, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड.कृष्णाजी यादव, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, राजेंद्र गायकवाड, अर्बन बॅंकेचे संचालक सत्यशिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, दिपक जाधव, राजाराम बोंद्रे, राहुल रणमोडे, सरपंच सुषमा रणमोडे, उपसरपंच सुर्यंकांत साळुंके उपस्थित होते.  

यावेळी पाटील यांनी सांगितले की, वीस वर्षाच्या कालावधी शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी कमी पडू दिले नव्हते. मात्र चार वर्षामध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. शेटफळच्या तलावामध्ये चिमणीला पिण्यासाठीसुद्धा पाणी नाही. मात्र बारामती तालुक्यामध्ये कालव्याला पाण्यामुळे शेवाळ आले तर दौंडमधील शेतकऱ्यांना ही पाणी मिळत आहे. केवळ निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. २०१४ साली तालुक्यामधील ७८ टक्के  क्षेत्र सिंचनाखाली होते.एक वर्षाचा साडेतीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळत होते. मात्र गेल्या चार वर्षामध्ये शेतीला पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांना जाब विचाल्यानंतर माझं काय चालत नाही असे उत्तर दिले जात आहे. या नुकसानाला निष्क्रिय लोकप्रतिनिधी जबाबदार असुन त्यांनी शेतकऱ्यांच्या संसाराशी खेळ खेळू नये अशी टीका पाटील यांनी केली.यावेळी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमीपुजन व उद्धाटन करण्यात आली. 

गुंडगिरीचा वापर करुन शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी पळविण्याचे षडयंत्र...
इंदापूर तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांना पाटपाण्याच्या हक्कासहित जमीनी दिल्या. मात्र ४६ क्रंमाकाच्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. याउलट शेतीमहामंडळाची संयुक्त करार शेतीपद्धतीने जमीन घेतले बडे उद्योजक गुंडगिरीचा वापर करुन नीरा डाव्या कालव्याचे शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी पळवत आहेत. या उद्योजकांना कोणाचा पाठिंबा आहे. याचा शोध घेवून  हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आवाज उठविण्याची गरज असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Web Title: loss of farmers because public representatives - Harshvardhan Patil