फेसबुक पोस्टमुळे सापडली हरवलेली चिमुरडी; चोवीस तासांनी झाली आई-वडिलांशी भेट 

Lost girl found due to Facebook post; Twenty-four hours afte she met parents
Lost girl found due to Facebook post; Twenty-four hours afte she met parents

सांगली ः आईचा पदर सोडून अवघ्या चार वर्षांची मुलगी भरकटली होती. ना पत्ता माहिती, ना पालकांचा मोबाईल नंबर... या स्थितीत सतर्क नगरसेवक अभिजित भोसले आणि समाज माध्यमातील एका पोस्टने मार्ग दाखवला. तब्बल चोवीस तासांनी या चिमुरडीला तिचे आई-वडील मिळाले. सांगलीतील आनंदशांती पार्कमध्ये ही घटना घडली. लक्ष्मी राकेश शिंदे असे त्या चिमुरडीचे नाव आहे. 

लक्ष्मीचे वडील राकेश हे कुटुंबासह कोल्हापूरमध्ये रहात होते. मोलमजुरीसाठी आठ महिन्यांपूर्वीचे ते कुटुंबासह सांगलीत वास्तव्यास आले. वडर कॉलनीत ते राहतात. लक्ष्मी ही आईची लाडकी मुलगी. काल खेळता खेळता ती चिमुरडी घरापासून दूर गेली. त्यानंतर तिला घरच सापडेना झाले. रडत रडत ते रस्त्यांवरून फिरू लागली.

हनुमाननगर येथील आनंदशांती पार्कमध्ये ती पोहोचली. दुपारची वेळ होती. पाणावलेले डोळे अन्‌ घबरलेल्या स्थितीत ती फिरत होती. परिसरातील नागरिक महेश सोनार आणि सोमनाथ भोसले यांना ती दिसून आली. त्यांनी विचारपूस केली, मात्र लक्ष्मी घाबरलेल्या अवस्थेत होती. 

कोल्हापूरला राहण्यास आहे, इतकीच तिला माहीत. तिला आई-वडिलांच्या आठवणीं खूप येऊ लागल्या. दोघांनी मित्रपरिवाराच्या मदतीने परिसरात चौकशी केली, मात्र काही माहिती मिळाली नाही. अखेर पोलिस ठाण्यात सारी हकीकत सांगितली. त्यानंतर नगरसेवक अभिजित भोसले यांनी त्या मुलीस आपल्या घरी नेले. अगदी मुलीप्रमाणे तिचा संभाळ केला. पण, भोसले यांना तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवण्याची चिंता होती. 

त्या मुलीचा फोटो फेसबुकवर शेअर केला. शहरातील तब्बल अठराशे जणांनी ही पोस्ट व्हायरल केली. आज सकाळी मुलीचे आई-वडील, यल्लव्वा रामा जाधव, दीपा व्हसकोटी (रा. वडार कॉलनी) यांनी भोसले यांच्याशी संपर्क केला. भोसले यांनी तातडीने स्थानिक नगरसेवक प्रकाश मुळके यांना माहिती दिली. ती मुलगी शिंदे यांची असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार ताब्यात देण्यात आले. त्या चिमुरडीला चोवीस तासांनंतर आई-वडील मिळाल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेना झाला. नगरसेवक भोसले आणि त्यांच्या मित्र परिवाराचे त्या कुटुंबीयांनी धान्यवाद व्यक्त केले. नगरसेवकाचा सजगपणा आणि समाज माध्यमातील एका पोस्टने हरवलेल्या चिमुरडीला आई-वडील मिळाले. 

पालक मिळाल्यानंतर एकच आनंद
चार वर्षांची ही मुलगी सापडल्यानंतर फेसबुकसह व्हॉटस्‌ऍपवर मेसेज व्हायरल केले. मित्र परिवारानेही तिच्या पालकांचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी पालक मिळाल्यानंतर एकच आनंद झाला. 
- अभिजित भोसले, नगरसेवक 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com