प्रेमाचा "गळ'फास

Love and murder
Love and murder

नेवासे (नगर) : तालुक्‍यातील जळके खुर्द शिवारात शनिवारी (ता. सात) मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी आज अटक केलीच; शिवाय त्यातूनच, या आरोपींनी वर्षभरापूर्वी केलेल्या खुनाचाही उलगडा झाला. नेवासे पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या श्रीरामपूर शाखेने ही कामगिरी केली. पोलिसांनी आज एका महिलेसह चार आरोपींना अटक केली. अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे. 


तालुक्‍यातील जळके खुर्द शिवारात पाटचारीमध्ये मंगल सोमनाथ दुशिंग (वय 35, रा. तांदूळवाडी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) या विवाहितेचा मृतदेह शनिवारी आढळून आला होता. त्या ठिकाणी एक मोबाईल सापडला होता. पोलिसांनी त्या आधारे संशयितांची चौकशी केली आणि चोवीस तासांत खुनाचा उलगडा करून आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी अमिन रज्जाक पठाण (वय 35, रा. बोलठाण, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), रतन छबूराव थोरात (वय 28, रा. तांदूळवाडी, ता. गंगापूर), सोनाली सुखदेव थोरात (वय 22, रा. तांदूळवाडी, हल्ली रा. गिडेगाव, ता. नेवासे), राजू भाऊसाहेब उघाडे (वय 50, रा. गिडेगाव), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 
पोलिसांनी सांगितले, की अमिन व सोनाली यांचे प्रेमसंबंध होते. त्यात अडथळा नको म्हणून या दोघांनी सोनालीचा पती सुखदेव थोरात याचा खून केला.

याची माहिती मंगल दुशिंगला होती. ती अमिनकडे वारंवार पैशांची मागणी करीत होती. त्यामुळे आरोपींनी मंगलचा जोगेश्वरी (वाळुंज, ता. गंगापूर) रस्त्यावर गळा आवळून खून केला आणि मृतदेह जळके खुर्द शिवारात आणून टाकला. याची कबुली आरोपींनी दिली आहे. 

केला खून; भासविली आत्महत्या 
याच आरोपींनी सुरेश थोरात याचा खून करून त्याचा मृतदेह कोपरगाव हद्दीत रेल्वे रुळांवर टाकून, त्याने आत्महत्या केल्याचे भासविले होते, असे आज उघड झाले. या खुनाचाही गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com