विचित्र आंधळ्या प्रेमाचा प्रवास मुंबई, शिर्डी व्हाया करमाळा ! 

अण्णा काळे 
सोमवार, 14 मे 2018

करमाळ्यात का आले.... 
"सैराट' चित्रपटामुळे करमाळा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी सोडताना नेमके कोठे जायचे? याचा विचार करणाऱ्या त्या प्रेम जोडीच्या डोळ्यासमोर करमाळा आला. आणि ते थेट करमाळ्यात पोहचले. ज्यावेळी या संपूर्ण प्रेमप्रकरणाचा उलघडा होऊ लागला व आगळीवेगळी माहिती ते पोलिसांना सांगू लागले. त्यामुळे त्यांची प्रेमकथा ऐकून व एकमेकांविषयी ओढ बघून पोलिसही अचंबित झाले.

करमाळा : प्रेमाला अनेक कवींनी, लेखकांनी वेगळ्या उपमा दिल्या आहेत. प्रेमाला वय, जात, धर्म नसतो... कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं... ते आंधळं असतं असंही म्हटलं जातं. प्रेमाची ही गोष्टच वेगळी असते. ते प्रेम कधी? कोठे? कोणावर बसेल हे सांगता येत नाही, याची प्रचिती करमाळ्यात आली आहे. एक विवाहीत चक्क तृतीयपंथीयाच्या प्रेमात पडला अन्‌ मुंबईतून सुरु झालेला त्याचा प्रवास शिर्डीमार्गे करमाळ्यापर्यंत आला आहे. मात्र हे प्रकरण पोलिसात पोहचल्याने व कुटुंबीयांपर्यंत गेल्याने त्यांना सध्यातरी वेगळे व्हावे लागले आहे. 

शिर्डी येथील 22 वर्षाचा विवाहित तरूण व मुंबई येथील एक तृतीयपंथीयी व्हॉटस्‌ऍप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. व्हॉटस्‌अप ग्रुपवर चॅटींग करता करता वैयक्तिक नंबररून चॅटींग सुरु झाले. त्यानंतर मोबाईलवरून संवाद सुरू झाला. काही दिवसानंतर दोघांनीही भेटायचे ठरवले. भेटीसाठी शिर्डीचा तरूण मुंबईला तर कामानिमित्त गुजरातमध्ये असलेला तृतीयपंथीय तेथून मुंबईला आला. दोघांची भेट झाली. त्यानंतर हे दोघे वारंवार भेटत राहिले. त्याच त्या तरूणाला हलगी वादन चांगले येत होते. तर त्या तृतीयपंथीयाला नाच कामाची आवड होती. दोन ते तीन कार्यक्रमात त्या तरूणांच्या हलगीच्या तालावर तृतीयपंथीयाने झकास नृत्य सादर केले. 

दरम्यान, एकत्र राहिल्याने व आवडीनिवडी जुळल्या अन्‌ आकर्षण निर्माण झाले. तरूण विवाहित असल्याने व इतर आपल्या नात्याला नावे ठेवतील, असे वाटल्याने त्यांनी राहण्यासाठी शिर्डीहून थेट करमाळा गाठले. परंतु त्यांच्या नाते फार काळ टिकले नाही. तरूणांच्या कुटुंबियांनी मोबाईल लोकेशनवरून करमाळा गाठले. येथील पोलिसांच्या मदतीने या जोडप्याचा शोध घेतला. पोलिस स्टेशनमध्ये हे दोघेही प्रेमवीर एकमेकांना सोडण्यास तयार नव्हते. दोघेही एकमेकांसाठी रडत होते. एका बाजूला तरूणांचे नातेवाईक त्याला समजावत होते. बायकोचा विचार कर असे करू नको म्हणून सांगत होते. मात्र ते दोघेही एकमेकांपासून वेगळे होण्यास तयार नव्हते. बराच वेळ समजूत घातल्यानंतर त्या तरूणांस नातेवाईकांच्या व मित्रांच्या ताब्यात दिले. 

करमाळ्यात का आले.... 
"सैराट' चित्रपटामुळे करमाळा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी सोडताना नेमके कोठे जायचे? याचा विचार करणाऱ्या त्या प्रेम जोडीच्या डोळ्यासमोर करमाळा आला. आणि ते थेट करमाळ्यात पोहचले. ज्यावेळी या संपूर्ण प्रेमप्रकरणाचा उलघडा होऊ लागला व आगळीवेगळी माहिती ते पोलिसांना सांगू लागले. त्यामुळे त्यांची प्रेमकथा ऐकून व एकमेकांविषयी ओढ बघून पोलिसही अचंबित झाले.

Web Title: love journey in Mumbai