प्रेमविवाह केल्याने विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

सोलापूर - तू आमच्या मुलाशी प्रेमविवाह केला आहे, असे म्हणून पैशाच्या व इतर कारणावरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका असलेल्या सासूसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सासू छाया कृष्णाजी आगवणे, सासरा कृष्णाजी गोविंद आगवणे, पती उल्हास कृष्णाजी आगवणे, जाऊ प्राजक्ता आशिष आगवणे (सर्व रा. लोकमान्य सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. नीलम उल्हास आगवणे (वय 24) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू छाया ही मुख्याध्यापिका आहे, सासरा कृष्णा हा निवृत्त पोलिस कर्मचारी आहे. पती उल्हास हा अक्कलकोट येथील शाळेत लिपिक आहे तर जाऊ प्राजक्ता ही डॉक्‍टर आहे. नीलम आणि उल्हास या दोघांनी प्रेमप्रकरणातून फेब्रुवारी 2014 मध्ये रूपाभवानी मंदिर येथे लग्न केले होते. सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याने नीलम यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. सहायक फौजदार मोहन बाबर तपास करीत आहेत.

बहिणीच्या लग्नातील खर्चाची मागणी
माझ्या बहिणीच्या लग्नात झालेल्या 15 लाखांचा खर्च दे, असे म्हणून शिवीगाळ करून खिशातून 30 हजार रुपये काढले. हा प्रकार सिद्धेश्‍वर पेठेतील सूर्या मेडिकल येथे घडला. याप्रकरणी अब्दूला सलीम खतीब व त्याचे तीन साथीदार (सर्व रा. न्यू बापूजीनगर, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अल्तमश कैसरहुसेन कादीर (वय 25, रा. गुरुवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कादीर हे दुकान बंद करीत होते. तिथे आरोपी अब्दूला हा साथीदारांसह आला. त्याने माझ्या बहिणीच्या लग्नात झालेला 15 लाख रुपयांचा खर्च दे, असे म्हणून शिवीगाळ करून खिशातील 30 हजारांची रक्कम काढून घेतली. पोलिस उपनिरीक्षक रिया बोधे तपास करीत आहेत.

Web Title: love marriage case