प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

shevgav.jpg
shevgav.jpg

शेवगाव : हिंगणगाव (ता. शेवगाव) येथील प्रेमीयुगलाने गावातील विहिरीमध्ये उडी घेवून आत्महत्या केली. हा प्रकार काल रात्री विहीर मालक संपत मिसाळ यांच्या लक्षात आला. आज सोमवारी (ता.१३) पोलीस, ग्रामस्थांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. याबाबत मुलीच्या आईने गुरूवारी (ता.९)  मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, हिंगणगाव ता. शेवगाव येथील ४० वर्ष महिलेने गुरुवार (ता.९)  १६ वर्ष वयाची मुलगी राहत्या घरातून शौचालयास जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती पुन्हा घरी आलीच नाही. त्यांनी गावातील व बाहेर गावच्या नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती सापडली नाही. शेजारीच राहणारा गावातील राजेंद्र परमेश्वर शिंदे (वय:२५) हा घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मुलीच्या आईने गुरुवारी रात्री शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये शिंदे यांच्या विरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
 

चार दिवसानंतर हिंगणगाव परिसरातील मिसाळ यांच्या विहीरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह त्यांना आढळून आले. आज सोमवार (ता.१३) ग्रामस्थ व पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह दुपारी १२ वाजता बाहेर काढले. दोन्ही मृतदेह कुजलेले असून मोठी दुर्गंधी सुटलेली होती. याबाबत दोन्ही कुटुंबांच्या वतीने एकमेकावर आरोप करण्यात आले आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीला नेण्यात येणार आहेत. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
युवक युवतीचे प्रेमसंबंध

युवक युवतीचे प्रेमसंबंध होते. मात्र घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com