MadanMohanMemory : वो भूली दास्तां, लो फिर याद आ गयी...! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

कोल्हापूर - वडापवाल्यांची गर्दी, बसस्थानकावर प्रवाशांची धावपळ आणि दूधकट्ट्यावरच्या "हैय्या-हैय्या'च्या आरोळीतही गंगावेश परिसरात आज शनिवारी गझलसम्राट मदनमोहनप्रमींनी गीत-संगीताचा उत्सव साजरा केला. गेली पस्तीसहून अधिक वर्षे (कै) चंद्रकांत जाधव यांच्या पुढाकाराने येथे हा कार्यक्रम साजरा केला जातो.

कोल्हापूर - वडापवाल्यांची गर्दी, बसस्थानकावर प्रवाशांची धावपळ आणि दूधकट्ट्यावरच्या "हैय्या-हैय्या'च्या आरोळीतही गंगावेश परिसरात आज  गझलसम्राट मदनमोहनप्रमींनी गीत-संगीताचा उत्सव साजरा केला. गेली पस्तीसहून अधिक वर्षे (कै) चंद्रकांत जाधव यांच्या पुढाकाराने येथे हा कार्यक्रम साजरा केला जातो.

दरम्यान, यानिमित्ताने "वो भूली दास्तां...', "लग जा गले...' अशा अवीट गीतांचा नजराना पेश झाला. मदनमोहन यांच्या 44 व्या स्मृतीदिनानिमित्त हा कार्यक्रम रंगला. 

गंगावेश टी स्टॉल म्हणजे कानसेंनासाठी अवीट गीतांची लायब्ररी. मदनमोहन यांच्यासह जुन्या चित्रपटगीतांची रसिकांची फर्माईश येथे केव्हाही पूर्ण केली जाते. मदनमोहन यांचा स्मृतिदिन म्हणजे या सर्व कानसेनांचा जणू स्नेहमेळावाच. यानिमित्ताने सारी मंडळी एकत्र येतात आणि आपल्या लाडक्‍या संगीतकाराला अभिवादन करतात.

चंद्रकांत जाधव यांच्या संग्रहातील 1950 च्या "आँखे' चित्रपटातील गीतांपासून ते "लैला-मजनू', "जेलर', "अदा', "मदहोश', "छोटेबाबू', "नया आदमी', "देख कबीरा रोया', "भाई-भाई", "आशियाना", "अदालत" आदी चित्रपटांतील गीतांच्या ध्वनिफिती ऐकविल्या जातात. यंदाही ही परंपरा जाधव बंधूंनी कायम ठेवली. मदनमोहनप्रेमींच्या गर्दीत येथे जणू अजरामर गीत-संगीताचा उत्सवच साजरा झाला. 

यावेळी पुण्याचे रसिक अनिल गोडे यांच्यासह सर्जेराव जाधव, प्रसाद मुझुमदार, श्रीकांत डिग्रजकर, बिपीन देशपांडे, विनय गोखले, एस. व्ही. बेनाडीकर, जगदीश जोशी, सुरेश मिरजकर, कविता जाधव, किशोर घाटगे आदींसह मदनमोहनप्रेमी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madan Mohan Memory special story