सांगली : जयश्री पाटील यांच्या विजयाने सांगलीत मदनभाऊ गट रिचार्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra

सांगली : जयश्री पाटील यांच्या विजयाने सांगलीत मदनभाऊ गट रिचार्ज

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांनी मोठा विजय मिळवला. या विजयानंतर माजी मंत्री मदनभाऊ गट पुन्हा रिचार्ज झाला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेले काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांचे सन २०१५ मध्ये निधन झाले. एकेकाळी मदन पाटील यांचे जिल्हा बँक, जिल्हा परिषद, महापालिका, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती या जवळपास सर्वच संस्थांवर वर्चस्व होते.

त्यामुळे राज्याच्या राजकारणात ही त्यांचा दबदबा होता. त्यांच्या वर्चस्वातूनच त्यांना रोखण्याचे काम वारंवार केले जात होते. त्यामुळेच सन 2004 ची विधानसभा निवडणूक वगळता त्यांना विधानसभेलाही अपयश पदरी पडले. मात्र तरीही त्यांचा दबदबा कमी झाला नव्हता. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली आणि ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पाठोपाठ २०१५ मध्ये झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही त्यांना विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काही महिन्यातच त्यांचे निधन झाले.

हेही वाचा: मोठी बातमी! बँक बुडाली तर 3 महिन्यातच मिळणार 5 लाखापर्यंतची रक्कम

मदन पाटील यांचा मोठा गट आजही जिल्ह्यात आहे. अनेक नेत्यांनी हा गट आपल्या बाजुला वळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तो नेहमीच स्वतंत्र अस्तित्व ठेवून राहिला आहे आणि आपले नेतृत्व जयश्री पाटील यांनीच करावे अशी त्यांची इच्छा आहे.

मदनभाऊंच्या निधनानंतर या गटाने जयश्री पाटील यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. परंतु त्या सक्रिय राजकारणात अजून पर्यंत धाडसाने उतरत नव्हत्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीवेळीही त्यांनी ऐनवेळी उमेदवाराची मागणी केली मात्र ती मिळू शकली नाही.

हेही वाचा: 'जिल्हा बँक तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है'

विधानसभा निवडणुकीनंतर दोन वर्षांनी होत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीच्या पॅनेलमधून त्यांना उमेदवारी दिली. त्याच वेळी त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. जयश्री वहिनींची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच मदनभाऊ गट मोठ्या उत्साहाने आणि ताकदीने कामाला लागला. या गटाला पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवून देण्याची संधी मिळाली. त्यामुळे जयश्री वहिनींच्या पाठीमागे त्यांनी आपली ताकद उभा केली. महिला राखीव गटातून त्यांची उमेदवारी असल्याने मदन भाऊंच्या कार्यकर्त्यांनी या गटात कसून प्रचार केला. त्याचा फायदा केवळ जयश्री वहिनीनाच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी पॅनेलला झाल्याचे दिसते.

आज निकाल जाहीर झाल्यानंतर मदन भाऊंचे कार्यालय असलेले विष्णुअण्णा भवन गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघाले. जवळपास 17 वर्षांनी मदन भाऊंच्या घराण्यात विजयाचा गुलाल लागला.

loading image
go to top