रखवडलेल्या कामाच्या निषेधार्थ पडसाळी ग्रामस्थांचा आत्मदहनचा इशारा

अक्षय गुंड 
सोमवार, 21 जानेवारी 2019

माढा (सोलापूर) - पडसाळी (ता.माढा) येथील सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे मंजुर असलेले काम रखडवल्याच्या प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थ २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करणार असल्याची माहिती युवा सेनेचे विभाग अधिकारी जयदेव पवार व भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी माढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर देशमुख, महादेव फरड, बाबुराव फरड अशोक देशमुख, भाऊसाहेब फरड आदि उपस्थित होते. पुढे ते म्हणाले की, पडसाळी गावच्या उत्तर आणि दक्षिण बाजुने सिना-माढा उपसा सिंचन योजनेच्या वितरीका गेल्या आहेत. यापैकी मोडनिंब वितरिकेचे काम दहा वर्षापूर्वी अरण गावच्या हद्दपर्यंत झाले आहे. यापुढील दोन किलोमीटरचे काम प्रस्तावित आहे. या कामासाठी शेतकर्यांनी भुसंपादनासाठी परवानगी दिली आहे. राजकिय हेतूने मंजुर असलेले काम रखडवले जात आहे. या ठिकाणचा मंजूर निधी इतरत्र वळवला जाण्याची शक्यता असून, पडसाळी गावास दुसर्याच ठिकाणाहून पाणी आणण्याचे गाजर लोकप्रतिनिधी दाखवत आहेत. ज्या ठिकाणाहून ते पाणी आणण्याचे आश्वासन देत आहेत. त्या ठिकाणची भौगोलिक रचना पाहता ते शक्य नाही. त्यामुळे मंजूर कामही होणार नाही. व योजना रखडल्याने या ठिकाणचा निधी इतरत्र वापरण्याचा लोकप्रतिनिधीचा डाव आहे. असा आरोप त्यांनी केला. पडसाळी या गावासाठी गट नंबर १९७ मधून गावाच्या दिशेने सरळ कालवा खोदण्यात यावा. शिंदे व जगदाळेवस्तीकडे एक मायनर काढण्यात यावा. लऊळ हद्दीतून कुर्मदास मंदिराच्या बाजूने पडसाळीच्या दिशेने मायनर साठी सर्वेक्षण करुन तो मंजूर व्हावा अशा मागण्या ग्रामसभेत ठरावाद्वारे करण्यात आल्या असुन, त्याच मागण्या निवदेणाद्वारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केल्या आहेत. 

या मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन झाल्यानंतर सामुहिक आत्मदहन करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे असे त्यांनी सांगितले.

Web Title: madha farmers will commit suicide for water conservation work