Loksabha 2019 : माढा मतदारसंघ सर्वांसाठीच लकी, विजयी उमेदवार दिल्लीत, तर पराभुत राज्याच्या मंत्रिमंडळात

vote
vote

उपळाई बुद्रूक (सोलापुर) - सध्या सर्वत्र लोकसभेचे वारे वाहत आहे. गेल्या दहा वर्षापुर्वी लोकसभा मतदार संघाची नव्याने रचना झाली. सोलापूर जिल्ह्यातील चार व सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ असा एकत्रित माढा लोकसभा मतदार संघ तयार करण्यात आला. नव्याने रचना झाल्यापासून या मतदार संघावर राष्ट्रवादीची सत्ता आहे. या मतदार संघातील विजयी उमेदवाराने दिल्लीत तर, पराभुत उमेदवारांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळालेली आहे. त्यामुळे विजयी उमेदवारापेक्षा हा मतदार संघ पराभुत उमेदवाराला लकी असल्याचे चित्र आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघातून कोण होणार खासदार व कोण होणार राज्याचा मंत्री अशी खुमासदार चर्चा मतदार संघातील गावागावातील कट्ट्यावर रंगत आहे.

माढा लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे माढा लोकसभेची नव्याने रचना झाल्यानंतर पहिल्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी येथून निवडणुक लढवली. त्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे सुभाष देशमुख व रासपचे महादेव जानकर यांनी निवडणुक लढवली. त्यावेळी शरद पवार मोठ्या फरकाने विजयी झाले. परंतु त्यांच्या विरोधातील ३ लाखांहुन अधिक मते पाहून भाजपने मित्रपक्षाची जुळवाजुळव करत. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीतर्फे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांनी तर त्यांच्या विरोधात भाजप मित्रपक्षाचे सदाभाऊ खोत व अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी निवडणुक लढवली. मोदी लाटेत देखील राष्ट्रवादीचा माढ्याचा गड ढासळला नाही. अगदी थोडक्या मताने राष्ट्रवादी विजयी झाली.  मोदी लाटेत माढ्याचा गड जिंकायचा स्वप्न पाहणार्यां भाजपचा या मतदार संघात भम्रनिरास झाला. एकदंरीत पाहता या मतदार संघातुन माजी मुख्यमंत्री व माजी उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीची स्वारी केली आहे. तर पराभुत उमेदवाराला देखील या मतदारसंघामुळे अच्छे दिन आलेले आहेत. २००९ व २०१४ च्या माढा लोकसभेच्या निवडणुकीत पराभुत झालेले सुभाष देशमुख, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, सध्याच्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात असुन राज्याचे नेतृत्व करत आहेत. हा आतापर्यंतचा या मतदार संघाचा इतिहास आहे. विजयी उमेदवारापेक्षा पराभूत उमेदवाराला हा मतदार संघ लकी ठरलेला आहे. महायुतीचा गेल्या निवडणुकीत थोडक्या मताने पराभव झाल्याने, यंदाची निवडणुक अत्यंत चुरशीची झाली  आहे. या मतदार संघात मोठी राजकीय उलथापालथ झालेली असुन, एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणुन ओळख असलेल्या या मतदार संघातील प्रमुख नेतेमंडळी भाजपच्या पंक्तीत बसले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादी व काँग्रेसचे आत्तापर्यंतच्या निवडणुकीत विजयासाठी हुकमी एक्के ठरलेले किंगमेकरच्या भूमिकेत असलेले नेते आज भाजपाचा प्रचार करताना दिसत आहेत. हि निवडणुक जशी भाजप विरूद्ध राष्ट्रवादी तशी शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी आहे. तशीच ती मोहिते पाटील व शिंदे कुटुंबियांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत माढा मतदार संघातुन दिल्लीची स्वारी कुणाला तर मंत्रिमंडळात संधी कुणाला हा येणार काळच सांगेल. 

२००९ ची माढा लोकसभा आकडेवारी 
(शरद पवार – ५३०,५९६), 
(सुभाष देशमुख – २१६,१३७) (महादेव जानकर – ९८,९४६)

२०१४ ची माढा लोकसभा आकडेवारी
(विजयसिंह मोहिते पाटील – ४८९,९८९),(सदाभाऊ खोत – ४६४,६४५), (प्रतापसिंह मोहिते पाटील – २५,१८७)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते खासदार व पराभुत ते मंत्री..
 - या मतदार संघातुन राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते विजयी झाले, तर पराभुत राज्यात झाले मंत्री सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशु दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, कृषीमंत्री सदाभाऊ खोत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com