सोलापूर : माढा तालुक्याला मिळाले तीन आमदार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

माढा (जि. सोलापूर) : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने माढा तालुक्याला आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय मामा शिंदे व आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या रूपाने एकाच वेळी तीन आमदार मिळाल्याची ऐतिहासिक घटना घडल्याने माढा तालुक्यातील जनतेत आनंदाची लाट उसळली आहे. तसेच आ. बबनराव शिंदे व संजय मामा शिंदे यांचे जावाई आ. संग्राम थोपटे भोर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने दोन आमदार जावायसह विधानभवनात गेले आहेत.

माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत तर त्यांचे बंधू संजयमामा शिंदे करमाळा विधानसभा  मतदारसंघातून अपक्ष म्हणून प्रथमच विधानसभेत गेले आहेत. तर मुळचे माढा तालुक्यातील वाकाव येथील डॉ. प्रा. आ. तानाजीराव सावंत हे शिवसेनेकडून भूम-परांडा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्याचा विजय उत्सवही माढा तालुक्यात झाला आहे. त्यामुळे माढा तालुक्यातून एकाच वेळी तीन आमदार होण्याचा बहुमान मिळाल्याने आनंदोत्सव साजरा होत आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने माढा तालुक्यातील निमगांव (टें) येथे तिहेरी आनंद साजरा केला आहे. एकीकडे बबनदादा व संजयमामा आमदार झाले तर दुसरीकडे आमदार बबनराव शिंदे यांचे जावई संग्राम थोपटे हे काॅग्रेस पक्षातून पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे गावात पेढे वाटून व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा होत आहे. निमगाव येथे न भूतो न भविष्यती अशी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आ. बबनराव शिंदे व त्यांचे भाऊ संजयमामा शिंदे हे दोन बंधू जावाई आ. संग्राम थोपटेंसह विधानभवनात गेले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madha taluka got three MLAs