नाट्यमय घडामोडीनंतर कोल्हापूर महापाैरपदी माधवी गवंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

कोल्हापूर - नाट्यमय घडामोडीनंतर येथील महापालिका महापाैरपदी माधवी गवंडी यांची निवड झाली. गवंडी यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर होताच ताराराणी आघाडीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. यामुळे गवंडी यांची बिनविरोध निवड झाली.

दिवसभरात उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ‘लोकसभेच्या निवडणुकीत थेट विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर यांच्या पत्नी सूरमंजिरी यांना महापौरपदाची उमेदवारी देऊ नये’, अशी तक्रार पक्षाचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली होती. यामुळे महापाैरपदासाठी कोणाचे नाव पुढे येणार याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर माधवी गवंडी यांनी यामध्ये बाजी मारली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhavi Gavande new mayor of Kolhapur municipal corporation