मधुरांगण हुरडा पार्टी आता २९ डिसेंबरला

Hurada
Hurada

सातारा - गुलाबी थंडीत लज्जतदार गरमागरम हुरडा, शेंगा, गूळ, खमंग चटण्या, ऊस, स्वीटकॉर्न आणि अस्सल गावरान तेही चुलीवरचे खमंग भोजन. सकाळ मधुरांगणची हुरडा पार्टी म्हटले, की हे सारे काही आलेच.

मधुरांगणच्या समस्त सदस्या वाट पाहात असलेली हुरडा पार्टी खास महिलांच्या आग्रहावरून आता २९ डिसेंबरला होणार आहे. निसर्गाच्या सानिध्यातील या एकदिवसीय सहलीत धमाल करण्याची संधी ‘मधुरांगण’ सदस्या आणि त्यांच्या कुटुंबातील महिला आणि मुलांसाठी आहे.

ही पार्टी २९ डिसेंबरला उरमोडी नदीकाठी शहापूर येथे साठे फार्म अँड रिसॉर्ट येथे होणार आहे. दिवसभर मौजमजा, मैत्रिणींसोबत धम्माल, गावरान गरमागरम भोजन आणि थंडीच्या या दिवसात मिळणारा लज्जतदार गरमागरम हुरडा, शेंगा, गूळ, खमंग चटण्या, ऊस, स्वीटकॉर्न महिलांना मिळणार आहे. 

हुरडा पार्टीचे ठिकाण साताऱ्यापासून जवळच असल्याने यावेळी जे स्वतःचे जबाबदारीवर, स्वतःच्या गाडीने येऊ इच्छितात, ते तसा पर्यायही निवडू शकतात. ज्यांना वाहनाची सुविधा सशुल्क हवी असेल त्यांनी पोवई नाक्‍यावरील ‘सकाळ’ कार्यालयाजवळ २९ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता यावे. या सहलीसाठी नावनोंदणी करणे गरजेचे असून, ‘सकाळ’ कार्यालयात आजपासून (मंगळवार) सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत नावनोंदणी करता येईल. मर्यदित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

 हुरडा पार्टी नोंदणी आजपासून; जागा मर्यादित 
 दुपारचे जेवण, हुरडा पार्टी शुल्क सर्व्हिस टॅक्‍ससह प्रतिव्यक्ती ४२५ रुपये (स्वतःच्या वाहनाने प्रवास)
 वाहन सुविधेसह शुल्क सर्व्हिस टॅक्‍ससह प्रतिव्यक्ती ५५० रुपये
 १२ वर्षांखालील मुलांना शुल्कात सवलत  
 अधिक माहितीसाठी चित्रा भिसे (मोबाईल ९९२२९१३३५८) यांच्याशी संपर्क साधावा.

नवीन सभासदांनाही संधी 
मधुरांगणचे सभासदत्व घ्यायचे राहून गेले असेल, तर लगेचच ‘सकाळ’ कार्यालयात केवळ ४०० रुपये वार्षिक शुल्क भरून मधुरांगण सभासद व्हावे. सभासद होताच ८५० रु. किमतीचा १२ पिसेसचा डिनर सेट गिफ्ट मिळेल. तसेच इतर अनेक लकी ड्रॉ गिफ्टस, फ्री गिफ्टस, वर्षभर मनोरंजनाचे दिमाखदार कार्यक्रम अशा अनेक गोष्टींचा लाभ घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com