मधुरांगणच्या व्यासपीठावर ‘झिंग झिंग झिंगाट’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

सांगली - मनसोक्त डान्सचा एन्जॉय, ‘झिंग झिंग झिंगाट’चा ठेका... संदेश देणारी एकांकिका, कवितावाचन असा जल्लोषी कार्यक्रम भावे नाट्य मंदिरच्या रंगमंचावर झाला. निमित्त होते मधुरांगण आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे आयोजित स्नेहसंमेलनाचे. ‘एक दिवस महिलांसाठी’ या भन्नाट कार्यक्रमाने ‘मधुरांगण’च्या सदस्य नोंदणीची वर्षअखेर झाली. 

सांगली - मनसोक्त डान्सचा एन्जॉय, ‘झिंग झिंग झिंगाट’चा ठेका... संदेश देणारी एकांकिका, कवितावाचन असा जल्लोषी कार्यक्रम भावे नाट्य मंदिरच्या रंगमंचावर झाला. निमित्त होते मधुरांगण आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे आयोजित स्नेहसंमेलनाचे. ‘एक दिवस महिलांसाठी’ या भन्नाट कार्यक्रमाने ‘मधुरांगण’च्या सदस्य नोंदणीची वर्षअखेर झाली. 

मधुरांगण परिवारातर्फे वर्षभर मैत्रिणींसाठी भन्नाट कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. ठसकेबाज लावणीने सुरवात झाल्याने वर्षात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. येणाऱ्या वर्षातही असेच भन्नाट कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प करत स्नहेसंमेलनाची गोड सांगता झाली. येथील प्रख्यात ‘सेवा सदन लाइफ लाइन’ कार्यक्रमाचे प्रायोजक होते. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर मैत्रिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमात पन्नासवर सभासदांनी भाग घेतला. अपंग सेवा केद्राच्या श्रीदेवी कांबळे यांनी ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’ या प्रार्थनेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. 

विशेष म्हणजे या कार्यक्रमात यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या सभासदही सहभागी झाले होते. त्यांचाही कलाविष्कार मैत्रिणींना पाहायला मिळाला. टाळ्या, शिट्ट्यांनी कलाकारांना दाद देत प्रोत्साहन देण्यात आले. ‘यिन’ने केलेल्या स्लो डान्सला प्रेक्षकांनी दाद दिली. उखाणे, फनीगेम्स्‌ यांनी कार्यक्रमांची रंगत वाढली. मराठमोळी लावणी, घागरा, कथ्थक असा भन्नाट कलाविष्कार रंगमंचावर मैत्रिणींना अनुभवला. ‘केडीसी’ ग्रुपने ‘राणी माझ्या मळ्यामध्ये, गज वदना, शिवाजीचा पाळणा, असा बहारदार नृत्याविष्कार सादर केला. अखेर प्रेक्षकात बसून आनंद घेणाऱ्या मैत्रिणींनी एकत्रित रंगमंचावर येत ‘झिंग, झिंग, झिंगाट’वर ठेका धरला. मस्त धम्माल करत स्नेहसंमेलनाची गोड सांगता केली. 

दरम्यान, डॉ. रविकांत पाटील यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन झाले. मधुरांगणच्या संयोजिका प्रियांका साळुंखे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सेवा सदन लाइफ लाइनचे सागर पोतराज, सागर मगदूम, दिलीप गाताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यिन समवन्वय विवेक पवार, प्रशांत जाधव, दीपाली सूतार, तेजस्विनी पाटील, इंद्रजित मुळीक, स्नेहल ढेरे, निकीता शिंदे, सुप्रभा केस्ते, ओंकार पवार यांनी संयोजन केले. ‘यिन’च्या सदस्या पोर्णिमा उपळावीकर हिने सूत्रसंचालन केले.

सभासद नोंदणीला प्रारंभ 
मैत्रिणींच्या हक्काचं अन्‌ आवडतं असं मधुरांगणच्या नवीन वर्षाच्या सभासद नोंदणीला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. नव्या वर्षात भन्नाट कार्यक्रम, प्रोबोधन शिबिरांसह आकर्षक योजनांचाही लाभ मैत्रिणींना घेता येणार आहे. तर मग यंदाही उत्स्फूर्त सहभागी व्हा!

Web Title: madhurangan member registration