मधुरांगण...खुले झाले नव्या माहेरचे अंगण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

सभासद नोंदणीस प्रारंभ : व्यक्‍तिमत्त्व विकासासोबत आत्मसन्मानही महत्त्वाचा - डॉ. काळे 
सांगली-मिरज - महिलांसाठी माहेरचे नवे अंगण असलेल्या ‘मधुरांगण’ची सभासद नोंदणी आज येथे उत्साहात सुरू झाली. येथील  ‘सकाळ’ सांगलीच्या विभागीय कार्यालयात पोलिस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे, महापालिकेच्या स्थायी सभापती संगीता हारगे यांच्या हस्ते, तर मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उपायुक्‍त स्मृती पाटील यांच्या हस्ते केक कापून मधुरांगणचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

सभासद नोंदणीस प्रारंभ : व्यक्‍तिमत्त्व विकासासोबत आत्मसन्मानही महत्त्वाचा - डॉ. काळे 
सांगली-मिरज - महिलांसाठी माहेरचे नवे अंगण असलेल्या ‘मधुरांगण’ची सभासद नोंदणी आज येथे उत्साहात सुरू झाली. येथील  ‘सकाळ’ सांगलीच्या विभागीय कार्यालयात पोलिस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे, महापालिकेच्या स्थायी सभापती संगीता हारगे यांच्या हस्ते, तर मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उपायुक्‍त स्मृती पाटील यांच्या हस्ते केक कापून मधुरांगणचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

यावेळी ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी, जाहिरात व्यवस्थापक (वरिष्ठ) उदय देशपांडे आणि सांगली, मिरजेतील केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती. 

सभासद नोंदणीस प्रारंभ झाल्यानंतर शुभेच्छा देताना डॉ. काळे म्हणाल्या, ‘‘स्त्रियांना व्यक्‍तिमत्त्व विकासासोबत आत्मसन्मानही महत्त्वाचा आहे. पुरुषाने काही मागणी केली तरी आपण  बेकायदेशीर गोष्टींना विरोध करण्याबाबत ठाम असले पाहिजे, तरच स्त्रीभ्रूणहत्या आणि
 महिलांवरील अत्याचार थांबतील. माध्यम क्षेत्रात विविध उपक्रम राबवून ‘सकाळ’ने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. 

‘सकाळ’ म्हणजे समाजासाठी एक आधारस्तंभ असून ‘तनिष्का’ आणि ‘मधुरांगण’ अशी सामाजिक व सांस्कृतिक व्यासपीठे महिलांसाठी दिली असून महिलांच्या विकासासाठी ती मोलाची ठरतील.’’ आजच्या धकाधकीच्या जीवनात मनोरंजनाची गरज आहे, मात्र त्याचबरोबर वैचारिक प्रगल्भतेसाठी चांगल्या पुस्तकांचे वाचन करा, असाही संदेश त्यांनी दिला. सौ. घारगे म्हणाल्या,  ‘‘काही क्षेत्रे पुरुषांच्या मक्‍तेदारीची असली तरी महिलांनी अशा ठिकाणी संधी मिळाली तर धैर्याने काम केल्यास यश मिळू शकते. स्थायी समिती सभापतिपद हे आव्हान मी असेच स्वीकारले आणि अडचणीतूनही मार्ग काढते आहे. 
 

धावपळीच्या जीवनात महिलांच्या कलागुणांना वाव देणारे ‘मधुरांगण’ हे महिलांचे नवे माहेर आहे.’’

महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या, ‘‘मधुरांगण’ हे महिलासांठीची सकारात्मक चळवळ आहे. महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासापासून ते स्वतःसाठी वेळ काढण्यापर्यंतचे अनेक उद्देश या चळवळीमुळे साध्य होतात. याचे चांगले परिणाम हे महिलांच्या व्यक्तिगत जीवनात दिसुन येतात. गेल्या अनेक वर्षांपासून मी स्वतः मधुरांगणशी संबंधित आहे. त्यामुळे महिलांच्या केवळ मनोरंजनासाठी किंवा करमणुकीसाठी हे माध्यम नाही तर महिलांच्या सक्षमीकरणासाठीचा एक सकारात्मक प्रयत्न आहे.’’

शेखर जोशी म्हणाले, ‘‘धकाधकीच्या जीवनात महिलांना विरंगुळा आणि विचार देणारे ‘मधुरांगण’ यावर्षी वेगळ्या कार्यक्रमांची भेट देईल.’’ मधुरांगणच्या संयोजिका प्रियांका साळुंखे, अनुजा कुलकर्णी यांनी स्वागत केले. मधुरांगण कोल्हापूरच्या संयोजिका जयश्री देसाई उपस्थित होत्या.

मधुरांगण कट्टा...
या वर्षी ‘मधुरांगण कट्टा’ ही नवी संकल्पना सुरू करण्यात आली असून, दर महिन्याला होणाऱ्या करमणुकीच्या कार्यक्रमाशिवाय हा एक जादा उपक्रम होणार आहे. यामध्ये दरमहा महिला एकत्र येतील आणि धमाल करतील, असे याचे स्वरूप असेल.

चला... ‘मधुरांगण’मध्ये सहभागी होऊ या !

सांगली 
  प्रियांका साळुंखे ः (७०५८२९७९६५)
 ज्योत्स्ना जोशी (९४२११७४८७५, ९२२६५७५५७९)
 रजनी नाईक (९८५०२०३४४४)
 ज्योती तेरवाडकर (९८९०८११२०६/(०२३३) २३३३४५६)
 सुरेखा बिनीवाले (९३७२११९१११ /(०२३३) २३३२७३७)
 संयोगिता आवटी (९८८१४९१९९१) 
 शोभा कुलकर्णी (९९२१९५९६२६ /(०२३३) २३०११५२)
  सुप्रिया लाड (९४२२३३२०५२)
 सविता आरळी (९२२५८००७५०)
अनुजा पाटील (९३७१०९१००९) 
 अपर्णा पाटील (८६२४९५२४९०)
  रेखा पाटील (९४२०८७५८१२)
 मायादेवी पवार (९०११२८७३३९) 
 जया जोशी (९८२२५९१६२५)

मिरज 
 अनुजा कुलकर्णी ः ९५५२५४०९८६
 गौरी बागलकोटे (९७६३५९९२६०)
 विद्या जोशी (०२३३-२२१२०००, ९६०४१६४९९८)
 सुजाता भगत (९६३७६७७९४५)
 सुनीता पोवाडे (८३०८५६०८५३)
 जबीन यरगट्टी (९१७५४२९१५१)
 गीतांजली इंगळे (९४०५९५५१५०)
 शोभा पाटील (९४२०५९२५२४)
 मंदाकिनी नागणे (९३७२२५१३१२)
 ज्योती शुक्‍ल (९९२२५७७९९७)

Web Title: madhurangan registration start