"मधुरांगण'तर्फे महिलांना  शुक्रवारपासून विविध कार्यक्रमांची पर्वणी 

madhurangan
madhurangan

कोल्हापूर - सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना यंदा मधुरांगण परिवारातर्फे विविध कार्यक्रमांची पर्वणी महिलांना मिळणार आहे. सर्जनशीलतेतून विविध कलाकृती साकारताना निखळ मनोरंजनातून आरोग्यदायी संकल्पही यानिमित्ताने करता येणार आहे. शुक्रवार (ता.30) पासून या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. 

ऍस्टर आधार हॉस्पिटलच्या सहकार्याने शुक्रवारी (ता.30) "स्तनाचा कर्करोग' या विषयावर परिसंवाद होणार आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे देण्यासाठी वेळच नाही. त्यामुळेच चाळिशीनंतर आरोग्याच्या विविध समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यातील एक गंभीर समस्या म्हणजे स्तनाचा कर्करोग. या विषयावर आजही थेटपणे बोलायला महिलांना संकोच वाटतो. मात्र, याबाबत सजग राहण्यासाठी घरच्या घरी करता येणाऱ्या काही विशेष तपासण्या आहेत. मुळात हा आजार होऊच नये म्हणून विशेष खबरदारीही घेता येते. याबाबत परिसंवादात विस्तृत चर्चा होणार आहे. हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद तिवले, डॉ. शिल्पा जोशी, कर्करोग तज्ज्ञ डॉ. बसवराज कडलगे परिसंवादात विशेष मार्गदर्शन करणार आहेत. राजर्षी शाहू स्मारक भवनातील मिनी सभागृहात दुपारी दोन ते चार या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, सर्व महिलांना त्यात सहभागी होता येईल. 

शनिवारी (ता.31) सकाळी अकरा वाजता शिवाजी उद्यमनगर येथील सकाळ कार्यालयात पेपर क्‍विलिंग कार्यशाळा होणार आहे. मधुरांगण सभासदांना पन्नास रुपये, तर बिगर सभासदांना दीडशे रुपये प्रवेश शुल्क असेल. या कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्‍यक असून, शुक्रवार (ता.30) पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत सकाळ कार्यालयात नोंदणी करावी. रविवारी (ता. 1) सकाळी दहा वाजता शाहूपुरी गवत मंडई येथील "हॉटेल झोरबा'च्या आनंद सभागृहात "जोडी तुझी माझी' स्पर्धा रंगणार आहे. नवीन वर्षाचा जल्लोष यानिमित्ताने सर्वांना अनुभवता येणार आहे. दोन फेऱ्यांत ही स्पर्धा होणार असून, त्यातून सर्वोत्कृष्ट जोडी निवडली जाणार आहे. विजेत्या जोडीला आकर्षक बक्षीस दिले जाईल. पहिल्या फेरीत कोणताही एक कलाप्रकार स्पर्धक जोडीला सादर करायवयाचा असून, दुसरी फेरी प्रश्‍नोत्तराची असेल. स्पर्धेसाठी हॉटेल झोरबाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. स्पर्धेसाठी मधुरांगण सभासदांना शंभर तर बिगर सभासदांना दीडशे रुपये प्रवेश शुल्क असेल. इच्छुकांनी सकाळ कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नोंदणी करणे आवश्‍यक आहे. 

यांचे विशेष सहकार्य 
स्तनाचा कर्करोग परिसंवादासाठी ऍस्टर आधार हॉस्पिटलचे विशेष सहकार्य मिळाले आहे. "जोडी तुझी माझी' स्पर्धेसाठी हॉटेल झोरबाचे विशेष सहकार्य मिळाले असून, उत्कृष्ट शाकाहारी जेवणाबरोबरच आता हॉटेलने लॉजिंगची सुसज्ज व्यवस्थाही केली आहे. दरम्यान, शनिवारी (ता.31) होणाऱ्या पेपर क्विलिंग कार्यशाळा आणि रविवारी (ता.1) होणाऱ्या "जोडी तुझी माझी' स्पर्धेसाठी नावनोंदणी आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- 9146041816. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com