पवारांचे पठ्ठे मद्रासी-गोंधळे पैलवानांची छाननीत खडाखडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सांगली : गावभागातील "टसल'मधील पारंपरिक विरोधक सुब्राव मद्रासी विरुध्द बाळासाहेब गोंधळे यांच्यातील सलामी अर्ज छाननी वेळी झडली आहे. दोघेही कधीकाळचे माजी आमदार संभाजी पवार यांच्या आद्य बजरंग तालमीचे मल्ल. या मल्लांची आज अर्ज छाननीत थोडी खडाखडी झाली. मद्रासी यांनी 2013 च्या निवडणुकीदरम्यान दाखल आचारसंहितेच्या गुन्ह्याची माहिती निवडणूक अर्जात नमूद केली नसल्याचा आक्षेप गोंधळे यांनी घेतला आहे. त्यांच्या या हरकत निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दाखल करून घेतली. गोंधळे म्हणाले,"मी अधिकाऱ्यांपुढे सर्व मुद्दे मांडले आहेत. मात्र त्यांनी मी कुणाचा या मुद्यांचा आधारे अर्ज बाद करू शकत नाही.

सांगली : गावभागातील "टसल'मधील पारंपरिक विरोधक सुब्राव मद्रासी विरुध्द बाळासाहेब गोंधळे यांच्यातील सलामी अर्ज छाननी वेळी झडली आहे. दोघेही कधीकाळचे माजी आमदार संभाजी पवार यांच्या आद्य बजरंग तालमीचे मल्ल. या मल्लांची आज अर्ज छाननीत थोडी खडाखडी झाली. मद्रासी यांनी 2013 च्या निवडणुकीदरम्यान दाखल आचारसंहितेच्या गुन्ह्याची माहिती निवडणूक अर्जात नमूद केली नसल्याचा आक्षेप गोंधळे यांनी घेतला आहे. त्यांच्या या हरकत निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दाखल करून घेतली. गोंधळे म्हणाले,"मी अधिकाऱ्यांपुढे सर्व मुद्दे मांडले आहेत. मात्र त्यांनी मी कुणाचा या मुद्यांचा आधारे अर्ज बाद करू शकत नाही. त्यासाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकता असा सल्ला दिला आहे.'' 

मद्रासी मुळचे पवार यांचे कार्यकर्ते. पवार यांच्यापासून फारकत घेत त्यांनी मदन पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीत, पुढे कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मद्रासी यांच्याविरोधात पवार यांनी गोंधळे यांच्यासारख्या पतसंस्थेतील शिपाई पैलवानास बळ देत गावभागातून सभागृहात पाठवले. गेली दोन टर्म गोंधळे यांनी मद्रासी यांना धुळ चारली आहे. यापुर्वी गोंधळे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून मद्रासी यांना पराभूत केले होते. आता पक्ष बदलले असून मद्रासी भाजपचे उमेदवार झाले आहेत. तर गोंधळे पवार यांच्या स्वाभीमानी आघाडीचे उमेदवार झाले आहेत. अनसुचित जाती प्रवर्गातून गावभागातील ही लढत पारंपरिक अशीच असेल. तिसऱ्यांदा हे दोन मल्ला समोरासमोर भिडत आहेत. 

Web Title: madrasi gondhale sangali