महाबळेश्वर-पांचगणी अपघात; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

महाबळेश्वर : महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर हॉटेल सूर्या जवळील तीव्र वळणावर महाबळेश्वरकडून पांचगणीच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या स्विफ्ट गाडीची समोरून येणाऱ्या टँकरशी समोरासमोर धडक झाली. यामध्ये स्विफ्ट गाडीतील पर्यटक सैफ शेख (रा.कोंढवा), शशांक सौरभ हे किरकोळ जखमी झाले. येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर पुणे येथे पुढील उपचारांसाठी त्यांना पाठवण्यात आले.

महाबळेश्वर येथे पर्यटनास आलेले पर्यटक आपल्या स्विफ्ट (एम एच ४३ बीजी ९६१३) या वाहनाने शुक्रवारी सकाळी पुणे येथे परतत असताना महाबळेश्वर पांचगणी या मुख्य रस्त्यावर मेटगुताड गावाजवळ असलेल्या हॉटेल सूर्या नजीकच्या तीव्र वळणावर अंदाज न आल्याने भरधाव वेगात असलेली ही गाडी समोरून महाबळेश्वरच्या दिशेने येणाऱ्या टँकर (एन एल ०१ एए १७७७) शी समोरासमोर धडक झाली. तेथे असलेले स्थानिक मंगेश बावळेकर यांनी या गाडीमधील पर्यटकांना बाहेर काढले. या पर्यटकांना जखमी अवस्थेत महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गाडीतील सैफ शेख, शशांक सौरभ हे किरकोळ जखमी झाले असून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर पुणे येथे पुढील उपचारांसाठी त्यांना पाठवण्यात आले.

Web Title: Mahabaleshwar Panchgani Road Accident Two Persons Injured